पीक परिस्थिती नाजूक, तरीही नजर पैसेवारी उत्तम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 06:00 AM2019-10-11T06:00:00+5:302019-10-11T06:00:07+5:30

निसर्गाच्या लहरीपणामुळे कापूस उत्पादनालाही मोठा फटका बसला आहे. कपाशीच्या पात्या गळून पडल्या. यामुळे बोंड परिपक्व होण्यासाठी विलंब लागला. मूग आणि उडीदाचेही पावसाने नुकसान झाले. सर्वच पिकांची स्थिती खालावली आहे. यामुळे हिरवेकंच दिसणारे पीक उत्पादन देताना फोल ठरले आहे.

Crop conditions are fragile, yet good for money! | पीक परिस्थिती नाजूक, तरीही नजर पैसेवारी उत्तम!

पीक परिस्थिती नाजूक, तरीही नजर पैसेवारी उत्तम!

Next
ठळक मुद्दे२०४८ गावांची पैसेवारी ६५ टक्के : महसूल विभागाच्या अहवालाने शेतकऱ्यांना धक्का

रूपेश उत्तरवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्याची पीक परिस्थिती नाजूक आहे. अशा स्थितीत महसूल विभागाने नजर पैसेवारी जाहीर करताना पीक परिस्थिती उत्तम असल्याचा अहवाल दिला आहे. यामुळे विवंचनेत अडकलेल्या शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे.
महसूल विभागाने जाहीर केलेल्या पैसेवारीनुसार शासन विविध योजनांची अंमलबजावणी करते. यामुळे पैसेवारीचा अहवाल महत्त्वपूर्ण मानला जातो. यंदा महसूल विभागाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात जिल्ह्यातील २०४८ गावांची नजर पैसेवारी उत्तम असल्याचा निर्वाळा दिला आहे. सततच्या पावसाने सोयाबीनला सूर्यप्रकाश मिळाला नाही. यामुळे शेंगा परिपक्व झाल्या नाही. यामुळे सोयाबीनचे उत्पन्न निम्म्यावर आले. यानंतरही नजर पैसेवारीत पीक स्थिती उत्तम असल्याचा अहवाल आला आहे.
निसर्गाच्या लहरीपणामुळे कापूस उत्पादनालाही मोठा फटका बसला आहे. कपाशीच्या पात्या गळून पडल्या. यामुळे बोंड परिपक्व होण्यासाठी विलंब लागला. मूग आणि उडीदाचेही पावसाने नुकसान झाले. सर्वच पिकांची स्थिती खालावली आहे. यामुळे हिरवेकंच दिसणारे पीक उत्पादन देताना फोल ठरले आहे. यानंतरही नजर पैसेवारीत याची कुठलीही नोंद घेतली गेली नाही. विशेष म्हणजे, हे संपूर्ण सर्वेक्षण ऑनलाईन केले जात आहे. यानंतरही त्यामध्ये नुकसानीची नोंद कशी नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आता या पैसेवारीमुळे नुकसानग्रस्त शेतकरी शासकीय मदतीसाठी पात्र कसे ठरणार हा प्रश्न आहे.

Web Title: Crop conditions are fragile, yet good for money!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.