यवतमाळ : येथील न्यायालय परिसरात चेक बाऊंस प्रकरणातील आरोपीला घेऊन आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला धमकाविण्यात आले. ही घटना शनिवारी दुपारी ३ वाजता घडली. या प्रकरणी दोषी वकिलाविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. अॅड. नासीर खिलजी (३०) रा. कळंब चौक यवतमाळ असे आरोपीचे नाव आहे. शहर ठाण्यातील नायक पोलीस शिपाई अश्विन पवार हे चेक बाऊंस प्रकरणातील आरोपी मो.शारीक मो. हफीज याला घेऊन न्यायालयात गेले होते. न्यायालय परिसरात सदर आरोपीचा भाऊ अॅड. नासीर खिलजी यांनी सदर शिपायाला शिवीगाळ करून वरिष्ठांकडे खोटी तक्रार देऊन गोवण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलीस शिपाई अश्विन पवार यांनी संबंधित न्यायाधीशाकडे वकिलाची तक्रार केली. त्यांनी दिलेल्या सूचनेवरूनच शहर पोलीस ठाण्यात अश्विन पवार यांच्या तक्रारीवरून वकिलाविरोधात शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करणे, अश्लील शिवीगाळ करणे व खोट्या तक्रारीत गोवण्याची धमकी देणे, अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल केल्याची माहिती पोलिसांनी ‘लोकमत’ला दिली. (कार्यालय प्रतिनिधी)
पोलिसांना धमकाविणाऱ्या वकिलाविरोधात गुन्हा
By admin | Updated: October 4, 2015 00:33 IST
येथील न्यायालय परिसरात चेक बाऊंस प्रकरणातील आरोपीला घेऊन आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला धमकाविण्यात आले.
पोलिसांना धमकाविणाऱ्या वकिलाविरोधात गुन्हा
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}