शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: 15 जूनपासून ऑनलाइन शाळा सुरू होण्याचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2020 19:34 IST

CoronaVirus News: या बैठकीत 15 जूनपासून ऑनलाइन शाळा सुरू कराव्या व पावसाळ्यानंतर कोरोना प्रादुर्भावाच्या परिस्थितीचा विचार करून ऑफलाइन शाळा सुरू करता येईल, असा सूर निघाला.

दारव्हा (यवतमाळ)- राज्यस्तरावर गठीत केलेल्या शैक्षणिक सल्लागार समितीची आज ऑनलाइन बैठक मुख्यमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्री राज्य शिक्षण मंत्री, शिक्षण सचिव, मुख्यमंत्र्यांचे सचिव प्राथमिक व माध्यमिक शिक्षण चे संचालक व शैक्षणिक सल्लागार समितीचे सदस्य यांचेमध्ये पार पडली. या बैठकीत कोरोना प्रादुर्भाव परिस्थितीत उद्भवणारे प्रश्न व त्यावरील उपाय यावर विचार मंथन झाले. या बैठकीत 15 जूनपासून ऑनलाइन शाळा सुरू कराव्या व पावसाळ्यानंतर कोरोना प्रादुर्भावाच्या परिस्थितीचा विचार करून ऑफलाइन शाळा सुरू करता येईल, असा सूर निघाला.या सोबतच वसंत घुइखेडकर यांनी विनाअनुदानित शाळांना अनुदान द्यावे, विनाअनुदानित शाळांना अनुदान द्यावे, शाळांना वेतनेतर अनुदान द्यावे, अनुकम्पावरील नियुक्त्यांना मान्यता द्यावी, संच मान्यतेसाठी अधारकार्डाची सक्ती करू नये, डेप्युटेशनवर शिक्षकांना पाठविण्याचे अधिकार शिक्षणाधिकारी यांनाच द्यावेत, ज्या शाळेत अर्ध्यापेक्षा जास्त पदे रिक्त आहेत ती भरती करावी, सेवकांची पदे भरावी, पदभरती शक्य नसल्यास कंत्राटी पद्धतीने भरती करावी, शाळेला संगणक शिक्षक  द्यावा, शाळा निर्जंतुकीकरणाचे साहित्य पुरवावे इत्यादी मागण्या शासनाकडे रेटून धरल्या.या सोबतच इतर सदस्यांनी सुद्धा चांगल्या सूचना केल्या. या बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, शालेय शिक्षण मंत्री मा. वर्षा गायकवाड, शिक्षण राज्यमंत्री मा. बच्चू कडू, मुख्यमंत्र्यांचे सचिव विलास खारगे, शिक्षण सचिव वंदना कृष्णा, कपिल पाटिल, वसंत  घुईखेडकर यवतमाळ, माध्यमिकचे शिक्षण संचालक मा. दिनकर पाटील, प्राथमिकचे शिक्षण संचालक मा. जगताप, डॉ. रमेश माशलकर, रयत शिक्षण संस्थेचे डॉ. अनिल पाटील, लातूरचे डॉ. अनिरुद्ध  जाधव, औरंगाबादेच रजनीकांत गरूड, विवेक सावंत पुणे, रवींद्र फडणवीस  नागपुर हे उपस्थित होते, असे संस्था चालक संघटनेचे प्रतिनिधी अनिल गायकवाड यांनी कळविले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस