शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पुसद, उमरखेड शहर आगीच्या घटनांनी हादरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 05:00 IST

अरुण नरसिंग हे पत्नीसह ज्ञानेश्वर मंदिर परिसरात राहत होते. रविवारी रात्री ते आतील खोलीत तर पत्नी विद्या नरसिंग या दुसऱ्या खोलीत झोपलेल्या होत्या. मात्र पहाटे ४ वाजताच्या सुमारास अचानक घराला आग लागली. विद्या नरसिंग यांनी आरडाओरड केल्यानंतर शेजारी धावून आले. परंतु अरुण नरसिंग यांची खोली पूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्याने त्यांचा होरपळून मृत्यू झाला.

ठळक मुद्देघराच्या आगीत वृद्धाचा झोपेतच होरपळून करूण अंत

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : घराला अचानक आग लागल्याने एका वृद्धाचा झोपेतच होरपळून मृत्यू झाला. तर संपूर्ण घरही जळून भस्मसात झाले. ही घटना शहरातील ज्ञानेश्वर मंदिर परिसरात रविवारी पहाटे घडली. अरुण केशरचंद नरसिंग (६२) असे मृताचे नाव आहे. अरुण नरसिंग हे पत्नीसह ज्ञानेश्वर मंदिर परिसरात राहत होते. रविवारी रात्री ते आतील खोलीत तर पत्नी विद्या नरसिंग या दुसऱ्या खोलीत झोपलेल्या होत्या. मात्र पहाटे ४ वाजताच्या सुमारास अचानक घराला आग लागली. विद्या नरसिंग यांनी आरडाओरड केल्यानंतर शेजारी धावून आले. परंतु अरुण नरसिंग यांची खोली पूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्याने त्यांचा होरपळून मृत्यू झाला. घराशेजारील रूपेश अग्रवाल, संदीप आहाळे, संतोष आहाळे, निखिल नरसिंग, अनिकेत आहाळे, शैलेष आहाळे यांनी अग्निशमन दलाला बोलावून आग विझविली. त्यानंतर ठाणेदार पी.डी. फाडे हे ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. अरुण नरसिंग यांचा जळालेला मृतदेह पोलिसांनी बाहेर काढून घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला.  

गाद्यांचे दुकान पेटून २० लाखांचे नुकसान उमरखेड : येथील पुसद रोडवरील युपीपी काॅलनीलगत फोम गाद्या व पिलो बनविणाऱ्या सिद्धीविनायक ग्रुप नामक दुकानाला रविवारी दुपारी शाॅर्टसर्किटमुळे आग लागली. या आगीत दुकानातील यंत्र सामुग्री व कच्चा माल अशा २० लाख रुपयांच्या साहित्याची राखरांगोळी झाली. यावेळी दुकानात कामगार हजर होते. सुदैवाने जीवित हानी टळली. नगरपरिषद अग्नीशमन दलाने आग नियंत्रणात आणली. मात्र दुकान मालक एकनाथ जाधव यांचे मोठे नुकसान झाले आहे. 

१५ दिवसांपासून होते उपाशी  या घटनेतील मृतक अरुण नरसिंग हे गेल्या १५ दिवसांपासून उपाशी हाेते. त्यांना अपत्य नाही. त्यामुळे घराला आग लागली की त्यांनी निराशेतून आत्महत्या करण्यासाठी घर पेटविले. याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. 

हिवरासंगम येथे औषधी दुकान पेटले हिवरासंगम : येथील भरवस्तीत असलेल्या औषधी दुकानाला आग लागून चार लाख रुपयांचे साहित्य खाक झाले. ही घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली. येथील विनायका मेडिकलमधील आगीत फ्रीजचा स्फोट होऊन धुराचे लोळ उसळले होते. सामाजिक कार्यकर्ते खंडेराव कदम यांनी माहूरवरून अग्निशमनची गाडी बोलाविली. मात्र तोपर्यंत दुकान खाक झाले. 

 

टॅग्स :fireआग