शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाचा खून करून प्रेत जाळले

By admin | Updated: January 7, 2017 00:13 IST

तरुणाचा निर्घृण खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचे प्रेत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना पुसद तालुक्यातील निंबी शिवारात शुक्रवारी उघडकीस आली. सदर तरुणाची ओळख पटली नसून

ओळख पटविण्याचे आव्हान : पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न
पुसद : तरुणाचा निर्घृण खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचे प्रेत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना पुसद तालुक्यातील निंबी शिवारात शुक्रवारी उघडकीस आली. सदर तरुणाची ओळख पटली नसून त्याचा प्रथम गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले.
पुसद-वाशिम मार्गावरील तुळजा भवानी घाटात रस्त्याच्या बाजूला एका अज्ञात तरुणाचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह शुक्रवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास आढळून आला. या घटनेची माहिती वसंतनगर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठले. सदर तरुण २५ ते ३० वर्षाचा असून त्याच्या अंगावर लालरंगाचा फुल टी-शर्ट व निळसर रंगाची जीन्स पँट घातलेली आहे. अज्ञात व्यक्तीने त्याचा गळा आवळून केला व त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहावर ज्वलनशील पदार्थ टाकून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. ही घटना परिसरात माहीत होताच बघ्यांची एकच गर्दी जमली. निंबी येथील पोलीस पाटील रामराव काळे यांनी वसंतनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. वसंतनगर पोलीस या तरुणाची ओळख पटविण्याचा प्रयत्न करीत असून मारेकऱ्यांचाही शोध घेत आहे. या खुनाचा शोध लावण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. (प्रतिनिधी)


कुटुंबीयांबद्दल अपशब्द वापरल्याने मित्राचा मोख येथे सुऱ्याने गळा चिरुन खून
दिग्रस : दारूच्या नशेत कुटुंबीयांबद्दल अपशब्द बोलणाऱ्या एका तरुणाची मित्रानेच सुऱ्याने गळा चिरुन निर्घृण हत्या केल्याची घटना दिग्रस तालुक्यातील मोख येथे शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. समाधान श्रीराम भगत (३०) रा. मोख असे मृताचे नाव आहे. तर कैलास विश्राम भगत (३०) रा. मोख असे आरोपीचे नाव आहे. समाधान हा गवंडी काम करीत होता. गुरुवारी रात्री समाधानला मित्र कैलासने जेवणाच्या ताटावरून उठवून दारू पिण्यासाठी नेले. दरम्यान या दोघांमध्ये शिवीगाळ सुरू होती. शुक्रवारी सकाळी समाधानचा मृतदेह गावात आढळून आला. त्याचा गळा चिरलेला आणि शरीरावरही अनेक ठिकाणी वार आढळून आले. या घटनेची माहिती दिग्रस पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. त्याच वेळी संशयित कैलास भगत याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसी खाक्या दाखविताच त्याने खुनाची कबुली दिली. दारूच्या नशेत समाधान हा शिवीगाळ करून कुटुंबाबद्दल अपशब्द बोलत होता. त्याचा राग धरुन आपण हे कृत्य केल्याची कबुली कैलासने पोलिसांपुढे दिल्याचे सांगण्यात आले. या घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश पांडे, पोलीस निरीक्षक शिवाजीराव बचाटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक दिनेश चव्हाण, बाबाराव पवार, देविदास आठवले, नारायण पवार, विवेक सूर्यवंशी, नीळकंठ चव्हाण करीत आहेत. मित्राची हत्या केल्याचे उघडकीस आल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे.