शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाध्यक्षांना हेव्यादाव्याचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 06:00 IST

विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. उमरखेड विधानसभा मतदारसंघात इच्छुकांची मोठी गर्दी आहे. पक्षश्रेष्ठींसह स्थानिक नेत्यांची त्यासाठी इंच्छुकांकडून मनधरणी सुरू आहे. उमरखेड विधानसभा मतदारसंघातील हे राजकीय हेवे-दावे भाजपच्या पराभवासाठी पुरेसे असल्याचे विरोधक सांगत आहेत.

ठळक मुद्देउमरखेड मतदार संघ : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू

ज्ञानेश्वर ठाकरे ।लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : तत्कालीन भाजपा जिल्हाध्यक्षांच्या उचलबांगडीनंतर उमरखेड विधानसभेचे पुत्र नितीन भुतडा यांच्या खांद्यावर पक्षश्रेष्ठींने जिल्ह्याची धुरा सोपविली. मात्र त्यांच्यापुढे आता पक्षातील अंतर्गत राजकीय हेव्या-दाव्यांचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. उमरखेड विधानसभा मतदारसंघात इच्छुकांची मोठी गर्दी आहे. पक्षश्रेष्ठींसह स्थानिक नेत्यांची त्यासाठी इंच्छुकांकडून मनधरणी सुरू आहे. उमरखेड विधानसभा मतदारसंघातील हे राजकीय हेवे-दावे भाजपच्या पराभवासाठी पुरेसे असल्याचे विरोधक सांगत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपची नागपूर येथे २७ ऑगस्ट रोजी एक बैठकही पार पडली आहे.विद्यमानांना डावलून नवीन चेहरा देण्यासाठी पक्ष भलेही धोका पत्करणार नाही. मात्र भाजपचे काही स्थानिक पुढारी व पदाधिकारी इच्छुकांना आपल्या वाहनातून बसवून फिरवत असल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीत आपला ‘भाव’ वधारण्यासाठी संबंधितांकडून असे अनेक प्रकार सुरू असल्याची बोलले जात आहे.आयाराम-गयारामांचे मनोबल वाढलेउमरखेड मतदार संघातून सलग दोनदा निवडून येण्याचा बहुमान अद्याप कुणीच प्राप्त केला नाही. त्यामुळे पक्षातील काही आयाराम-गयारामांचे मनोबल वाढले आहे. याच राजकीय हेव्या-दाव्याचे आव्हान नवनिर्वाचित भाजप अध्यक्ष कसे पेलतील, हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. भाजपच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ आपल्याकडे शाबूत ठेवण्याची, जबाबदारीही नवनिर्वाचित अध्यक्षांना पार पाडावी लागणार आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपा