शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

कमालच! २० मिनिटात ५६ विषय मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2022 05:00 IST

सभा ऑफलाईन घेण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह मंत्रालय स्तरापर्यंत प्रयत्न केले. मात्र कोठूनही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे अखेरीस ही सभा ऑनलाईन पद्धतीनेच पार पडली. या सभेत विषय पत्रिकेवर तब्बल ५६ विषय ठेवण्यात आले होते. त्यापैकी केवळ जिल्हा परिषद योजना अंतर्गत २०२०-२१ चे सुधारित आणि २०२१-२२ चे मूळ अंदाजपत्रक जिल्हा परिषद सेस फंडातून खरेदीच्या साहित्यात  दुरुस्ती करण्याचा विषय नामंजूर केले.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा बुधवारी दुपारी आयोजित करण्यात आली होती. अवघ्या २० मिनिटात या ऑनलाईन सभेत तब्बल ५६ पैकी ५५ विषयांना मंजुरी देण्यात आली. केवळ एक विषय नामंजूर करण्यात आला. जिल्हा परिषदेची अखेरची सर्वसाधारण सभा ऑफलाईन पद्धतीने घेण्याची विरोधकांची मागणी होती. मात्र शासनाच्या निर्बंधांमुळे ही सभा ऑनलाईन पद्धतीनेच घेण्यात आली. सभा ऑफलाईन घेण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह मंत्रालय स्तरापर्यंत प्रयत्न केले. मात्र कोठूनही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे अखेरीस ही सभा ऑनलाईन पद्धतीनेच पार पडली. या सभेत विषय पत्रिकेवर तब्बल ५६ विषय ठेवण्यात आले होते. त्यापैकी केवळ जिल्हा परिषद योजना अंतर्गत २०२०-२१ चे सुधारित आणि २०२१-२२ चे मूळ अंदाजपत्रक जिल्हा परिषद सेस फंडातून खरेदीच्या साहित्यात  दुरुस्ती करण्याचा विषय नामंजूर केले.जिल्हा परिषद अध्यक्ष कालिंदा पवार यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या सभेला उपाध्यक्ष बाळासाहेब कामारकर, शिक्षण व आरोग्य सभापती श्रीधर मोहोड, समाज कल्याण सभापती विजय राठोड, महिला व बाल कल्याण सभापती जयश्री पोटे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते. सभेत अति जीर्ण इमारतींचे निर्लेखन, योजनांची तरतूद, आर्णी तालुक्यातील शेलू (से) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारत बांधकामासाठी १४ कोटींच्या निधीस प्रशासकीय मान्यता, घाटंजी तालुक्यातील शिवणी पीएचसीच्या बांधकामासाठी ५४ कोटींची प्रशासकीय मान्यता, नरेगाच्या कृती आराखड्यास मान्यता आदी कामांना मंजुरी देण्यात आली. 

रेल्वेला पुलासाठी मंजुरी- जिल्ह्यातून वर्धा-पुसद-नांदेड नवीन ब्रॉडग्रेज रेल्वे मार्ग जात आहे. हा मार्ग जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील काही जमिनीवरून जात आहे. त्यामुळे काही जमीन दुभागत आहे. अशा ठिकाणी रेल्वे विभागामार्फत स्वखर्चाने भूमिगत पूल, उड्डाणपूल आदीच्या बांधकामास सर्वसाधारण सभेने मंजुरी बहाल केली आहे. अध्यक्ष कालिंदा पवार यांनी ही सभा शासनाच्या निर्देशानुसार आभासी पद्धतीने घेण्यात आल्याचे सांगितले. सभेत जिल्ह्याच्या सर्वांगीण विकास विषयक कामांना तसेच प्रशासनीक, वित्तीय व धोरणात्मक विषयांना मंजुरी दिल्याचे सांगितले.

 

टॅग्स :zpजिल्हा परिषद