शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

आठव्या मजल्यावरून पडून वृद्धाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2022 05:00 IST

प्रभाकर गोविंदराव पाथ्रडकर असे मृताचे नाव आहे. ते वेकोलितील सेवानिवृत्त कर्मचारी होते. ते त्यांचा मुलगा, सून व  नातवंडासह शहरातील शेवाळकर परिसरातील स्नेहगोत्री नामक इमारतीच्या आठव्या मजल्यावर बी-विंगमध्ये वास्तव्याला होते. शुक्रवारी पहाटे ते उठले. त्यानंतर ते घराच्या गॅलरीत फिरण्यासाठी गेले. गॅलरीत फिरताना अचानक त्यांचा तोल गेला आणि ते आठव्या मजल्यावरून खाली पडले. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : पहाटेच्या वेळी गॅलरीत फिरत असलेल्या एका वृद्धाचा तोल जाऊन आठव्या मजल्यावरून खाली पडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. येथील यवतमाळ मार्गावरील शेवाळकर परिसरात ही घटना घडली. प्रभाकर गोविंदराव पाथ्रडकर असे मृताचे नाव आहे. ते वेकोलितील सेवानिवृत्त कर्मचारी होते. ते त्यांचा मुलगा, सून व  नातवंडासह शहरातील शेवाळकर परिसरातील स्नेहगोत्री नामक इमारतीच्या आठव्या मजल्यावर बी-विंगमध्ये वास्तव्याला होते. शुक्रवारी पहाटे ते उठले. त्यानंतर ते घराच्या गॅलरीत फिरण्यासाठी गेले. गॅलरीत फिरताना अचानक त्यांचा तोल गेला आणि ते आठव्या मजल्यावरून खाली पडले. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. आठव्या माळ्यावरून खाली पडल्याचे परिसरातील सुरक्षारक्षकाच्या लक्षात आले. सुरक्षारक्षकाने या घटनेची माहिती लगेच त्यांच्या कुटुंबाला दिली. कुटुंबीयांनी तातडीने त्यांना रुग्णालयात आणले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती होताच, नागरिकांनी घटनास्थळ व रुग्णालयात एकच गर्दी केली होती. त्यांच्या मागे दोन मुले, सुना, नातवंडे व बराच मोठा आप्तपरिवार आहे. येथील सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ पाथ्रडकर यांचे ते बंधू होते. 

दोन वर्षांपासून होते पक्षाघाताने आजारीमृत प्रभाकर पाथ्रडकर हे गेल्या दोन वर्षांपासून पक्षाघाताने आजारी होते. त्यामुळे चालताना त्यांचा बॅलेंस जात होता. ही बाब कुटुंबीयांना माहीत असल्याने ते घराची गॅलरी बंदच ठेवायचे. मात्र शुक्रवारी पहाटे प्रभाकर पाथ्रडकर गॅलरीत गेले. तेथे फिरत असताना त्यांचा तोल जाऊन ते आठव्या मजल्यावरून खाली कोसळले.

 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू