शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

कीटकनाशक फवारणीतून विषबाधेवर यंत्रणा सतर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 21:58 IST

कीटकनाशक फवारणीतून विषबाधा टाळण्यासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. यादृष्टीने प्रामुख्याने आरोग्य विभागाला विशेष सूचना देण्यात आल्या आहे. २०१७ ची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे.

ठळक मुद्देआरोग्य विभागाला विशेष सूचना : २०१७ ची पुनरावृत्ती टाळण्याचे प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कीटकनाशक फवारणीतून विषबाधा टाळण्यासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. यादृष्टीने प्रामुख्याने आरोग्य विभागाला विशेष सूचना देण्यात आल्या आहे. २०१७ ची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे.कीटकनाशक फवारणीतून विषबाधा झाल्याने सन २०१७ मध्ये एकट्या यवतमाळ जिल्ह्यात २२ शेतकरी, शेतमजुरांचा मृत्यू झाला होता. विदर्भात हा आकडा ४३ वर पोहोचला होता. एक हजार ८०० शेतकरी, शेतमजूर बाधित झाले होते. हा प्रकार दिल्लीपर्यंत पोहोचला. संपूर्ण प्रशासन हादरून गेले होते. यावर अनेक उपाय करण्यात आले. २०१८ मध्येही उपायांची मालिका सुरूच ठेवण्यात आली. त्यामुळे विषबाधा बळीचे प्रमाण अतिशय नगण्य राहिले.आता चालू हंगामात कीटकनाशक फवारणीमुळे शेतकरी, शेतमजुरांना बाधा होऊ नये यासाठी काय खबरदारी घ्यावी, याच्या मार्गदर्शक सूचना आरोग्य सेवा उपसंचालक अकोला यांनी केल्या आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सकांना याविषयीची माहिती कळविण्यात आली आहे. प्रामुख्याने कापूस, सोयाबीन, तूर या पिकावर कीटकनाशक फवारणी करणाऱ्या शेतमजुरांची नि:शुल्क आरोग्य तपासणी करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयामार्फत विशेष अभियान राबविले जाणार आहे. कीटकनाशक फवारणी करताना शेतकरी, शेतमजुरांनीही दक्षता घेणे गरजेचे आहे.आरोग्य तपासणीसाठी प्रवृत्त करणारकीटकनाशक फवारणी करणाऱ्या शेतकरी, शेतमजुरांना आरोग्य तपासणी करून घेण्यासाठी प्रवृत्त केले जाणार आहे. तपासणी झाली असलेल्या मजुरांना आरोग्य विभागातर्फे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे घेतल्या जाणाऱ्या उपक्रमांचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा, यासाठी प्रयत्न करावे, अशा सूचना आरोग्य सेवा उपसंचालकांनी केल्या आहेत. तसे पत्र अमरावती विभागाच्या पाचही जिल्ह्यातील जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सकांना पाठविण्यात आले आहे.

टॅग्स :agricultureशेतीHealth Tipsहेल्थ टिप्स