शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

२१ मार्चपासून झेडपीवर प्रशासक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2022 05:00 IST

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विषय समिती सभापती तसेच पंचायत समित्यांचे सभापती आणि उपसभापती यांचा कार्यकाळ या महिन्यात संपुष्टात येत आहे. जिल्हा परिषदेचा कार्यकाळ २० मार्च रोजी संपणार आहे. मात्र ओबीसी आरक्षणामुळे निवडणूक लांबणीवर पडणार आहे. जवळपास सहा महिन्यांचा अवधी लागणार आहे. त्यामुळे शासनासमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यावर ग्रामविकास विभागाने शासन राजपत्रात आदेश प्रसिद्ध केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांची मुदत येत्या २० मार्च रोजी संपणार आहे. पंचायत समितीच्या लोकप्रतिनिधींची मुदतही त्यापूर्वीच संपणार आहे. त्यामुळे शासनाने जिल्हा परिषद व पंचायत समितीवर प्रशासक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती केल्याचे आदेश धडकले आहेत. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विषय समिती सभापती तसेच पंचायत समित्यांचे सभापती आणि उपसभापती यांचा कार्यकाळ या महिन्यात संपुष्टात येत आहे. जिल्हा परिषदेचा कार्यकाळ २० मार्च रोजी संपणार आहे. मात्र ओबीसी आरक्षणामुळे निवडणूक लांबणीवर पडणार आहे. जवळपास सहा महिन्यांचा अवधी लागणार आहे. त्यामुळे शासनासमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यावर ग्रामविकास विभागाने शासन राजपत्रात आदेश प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना २१ मार्चपासून सर्व सूत्रे हाती घेण्याचे निर्देश देण्यात आले. राज्य निवडणूक आयोगाने ४ फेब्रुवारीच्या पत्रात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका विहीत मुदत घेणे शक्य नसल्याचे शासनाला कळविले होते. तसेच निवडणूक आयोगाने राज्य शासनाला प्रशासकाची नियुक्ती करण्यासंबंधीही निर्देश दिले होते. त्यावरून महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम १९६१ (सन १९६२ चा ५) मधील कलम ९१ ब आणि ७५ ब या कलमानुसार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या सर्व अधिकारांचा वापर करण्यासाठी तसेच कर्तव्य पार पाडण्यासाठी प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. निवडणुकीतून पदे भरली जातील तोपर्यंत मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासक म्हणून कामकाज सांभाळणार आहे. 

ओबीसी आरक्षणाचा तिढा कायमचओबीसी आरक्षणामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. पुढील किमान सहा महिने जिल्हा परिषद व पंचायत समितीवर प्रशासक राहणार आहे. जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांची नव्याने रचना होईपर्यंत निवडणूक शक्य नाही. दरम्यान, पुढील निवडणुकीत जिल्ह्यात आठ जिल्हा परिषद सदस्य आणि १६ पंचायत समिती सदस्यांची संख्या वाढणार आहे.

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदOBC Reservationओबीसी आरक्षण