शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

सीईओंच्या भेटीत ३० कर्मचारी गैरहजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2022 05:00 IST

यापूर्वी काही प्रमाणात पदाधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांवर वचक राहात होता. मात्र, आता पदाधिकारी नसल्याने अनेक कर्मचारी सुस्तावले आहेत. हीच बाब हेरून सीईओ डाॅ. पांचाळ यांनी शुक्रवारी विविध विभागांना आकस्मिक भेट देण्याचा निर्णय घेतला. या भेटीतून वास्तव समोर आले. वास्तविक शासकीय कार्यालय ६.१५ पर्यंत सुरू ठेवण्याचे निर्देश आहेत. आठवडा पाच दिवसांचा झाल्याने ही वेळ वाढली आहे. तथापि, अनेक कर्मचारी ६.१५ पर्यंत थांबतच नसल्याचे दिसून आले. 

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शुक्रवारी आकस्मिक काही विभागांना भेट दिली. या भेटीत तब्बल ३० कर्मचारी वेळेपूर्वीच कार्यालयातून गायब झाल्याचे दिसून आले. मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. श्रीकृष्ण पांचाळ, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात, अधीक्षक सुरेश चव्हाण, स्वीय सहायक शरद साळवे आदींनी शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास जिल्हा परिषदेच्या काही विभागांना आकस्मिक भेट दिली. सीईओंनी प्रथमच अशा प्रकारची भेट दिली. या भेटीत बांधकाम विभाग क्र. १ मध्ये तब्बल २६ कर्मचारी गायब आढळले. जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाला भेट दिली असता, तेथेही दोन कर्मचारी गैरहजर दिसून आले. याशिवाय कृषी विभागाच्या भेटीतही दोन कर्मचारी कार्यालये बंद होण्यापूर्वीच गायब झाल्याचे आढळले. पदाधिकारी व सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर प्रशासक म्हणून  सीईओंकडे कारभार आला आहे. यापूर्वी काही प्रमाणात पदाधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांवर वचक राहात होता. मात्र, आता पदाधिकारी नसल्याने अनेक कर्मचारी सुस्तावले आहेत. हीच बाब हेरून सीईओ डाॅ. पांचाळ यांनी शुक्रवारी विविध विभागांना आकस्मिक भेट देण्याचा निर्णय घेतला. या भेटीतून वास्तव समोर आले. वास्तविक शासकीय कार्यालय ६.१५ पर्यंत सुरू ठेवण्याचे निर्देश आहेत. आठवडा पाच दिवसांचा झाल्याने ही वेळ वाढली आहे. तथापि, अनेक कर्मचारी ६.१५ पर्यंत थांबतच नसल्याचे दिसून आले. 

अशा भेटींची वारंवार गरज- सीईओंनी प्रथमच शुक्रवारी विविध विभागांना आकस्मिक भेट दिली. पदाधिकारी नसल्याने अशा भेटींची वारंवार गरज आहे. ही बाब काही दिवसांपूर्वी सीईओंच्या लक्षात आणून देण्यात आली होती. कदाचित त्यामुळेच त्यांनी शुक्रवारी आकस्मिक पाहणी केली. या पाहणीत गैरहजर आढळलेल्या ३० कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये धाकधूक वाढली आहे.

 

टॅग्स :zpजिल्हा परिषद