Next

विदर्भात 'स्वाभिमानी'चे दुध आंदोलन पेटले, दुधाचा टँकर जाळण्याचा प्रयत्न!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2018 06:49 PM2018-07-15T18:49:07+5:302018-07-15T18:49:22+5:30

अमरावती : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरु होण्याआधीच पेटले आहे. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रविवारी वरुडवरुन नागपुरला जाणारा दुधाचा टँकर फोडला ...

अमरावती : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरु होण्याआधीच पेटले आहे. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रविवारी वरुडवरुन नागपुरला जाणारा दुधाचा टँकर फोडला आणि पेटविण्याचाही प्रयत्न केला. दरम्यान, प्रती लिटर पाच रुपयाप्रमाणे दुधाचे अनुदान शेतक-यांच्या खात्यात जमा करावे, या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानीने १६ जुलै पासून मुंबईचे दूध तोडण्याचा इशारा दिला आहे. आज मध्यरात्रीपासून हे आंदोलन करण्यात येणार आहे.