शहरं
Join us  
Trending Stories
1
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
2
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
3
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
4
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
5
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
6
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
7
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
8
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
9
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
10
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
12
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
13
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
14
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
15
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
16
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
17
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
18
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
19
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
20
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

जालना-नागपूर महामार्गावर अपघातात युवक जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 11:46 IST

Accident News : दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना २२ मे रोजी सकाळी ७ वाजताच्या दरम्यान धानोरा ताथोड गावानजीक असलेल्या घडली.

कारंजा लाड : जालना-नागपूर महामार्गाने जात असताना गतिरोधकावर वाहनाचा तोल जाऊन घडलेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना २२ मे रोजी सकाळी ७ वाजताच्या दरम्यान धानोरा ताथोड गावानजीक असलेल्या घडली. अमोल तानबाजी पाथोडे असे मृताचे नाव आहे. 
जालना-नागपूर या महामार्गाचे पुलगाव-जालना दरम्यान सध्या काम सुरू आहे. धानोरा ताथोड गावानजीक रस्ता काम सुरू आहे. या दरम्यान काही गतिरोधक तयार करण्यात आले आहेत. गतिरोधकावर पांढरा पट्टा मारला जात नाही. परिणामी गतिरोधकावर दुचाकी किंवा चारचाकी वाहन येऊन धडकते.  २२ मे रोजी सकाळी ७ वाजताच्या दरम्यान एमएच २९ एएस ६१४० क्रमांकाच्या दुचाकीने अमोल तानबाजी पाथोडे (३२) रा. वैतखेड, ता. जि. यवतमाळ हा धानोरा-ताथोड मार्गे कारंजाकडे येत असताना धानोरा गावानजीक असलेल्या गतिरोधकावरून पडला. डोक्याला जबर मार लागल्याने यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच सर्वधर्म आपत्कालीन पथकाचे श्याम सवाई यांनी तात्काळ धानोरा गावातील नरेंद्र कावरे व संदीप ताथोड याच्याशी संपर्क साधून घटनास्थळ गाठले होते.

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजाAccidentअपघात