शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘जलयुक्त शिवार’द्वारे पाणी टंचाईवर मात शक्य!

By admin | Updated: March 9, 2016 02:11 IST

जलजागृती सप्ताहांतर्गत कार्यक्रमात राजेंद्र सिंह यांचे प्रतिपादन.

वाशिम : महाराष्ट्र शासनाने गेल्या वर्षीपासून सुरु केलेल्या जलयुक्त शिवार अभियानाद्वारे पाणीटंचाईवर मात करणे शक्य असल्याचे प्रतिपादन मॅगसेसे पुरस्कार विजेते जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी केले. जलयुक्त शिवार अभियान समिती व 'आत्मा' वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने वाटणे लॉन्स येथे ८ मार्च रोजी आयोजित जलजागृती कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्ह्यातील शेतकरी, ग्रामस्तरीय पदाधिकारी व कर्मचारी यांना जलयुक्त शिवार अभियानाविषयी मार्गदर्शन व्हावे, यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता.
डॉ. राजेंद्र सिंह म्हणाले की, विदर्भात राजस्थानपेक्षा चौपट पाऊस पडतो; मात्र या ठिकाणी उष्णता अधिक असल्याने पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होते. त्यामुळे येथील लोकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. पावसाचे पडणारे पाणी जास्तीत जास्त प्रमाणात जमिनीत जिरवणे हाच विदर्भातील दुष्काळावरील उपाय आहे. गेल्या वर्षी जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून पावसाचे पाणी जमिनीत जिरविण्याचे काम मोठ्या प्रमाणात झाले असल्याचे त्यांनी सांगितले. जमिनीवरील हिरवळ कमी होत असल्याने जमिनीची उष्णता वाढली आहे, त्यामुळे ऋतुचक्र बदलले असल्यामुळे पावसाचे प्रमाण कमी-अधिक होत आहे, तसेच अवेळी पाऊस पडत आहे. जमिनीवरील हिरवळीचे प्रमाण वाढवून जमिनीची उष्णता कमी केल्याशिवाय ऋतुचक्र संतुलित राहणार नाही, असे डॉ. राजेंद्र सिंह म्हणाले. यावेळी त्यांनी राजस्थानमधील अल्वर जिल्ह्यातील कामांचे उदाहरण देऊन ऋतुचक्र संतुलित कसे करता येईल, हे सांगितले. जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून पावसाचे जास्तीत जास्त पाणी जमिनीत जिरविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे जमिनीची धूप व उष्णता कमी होण्यास मदत होईल. तसेच ऋतुचक्र संतुलित होऊन पावसाचे प्रमाण पूर्ववत होईल. शेतकर्‍यांनी जलयुक्त शिवार अभियानात सक्रिय सहभाग नोंदवून पावसाचे पाणी जमिनीत जिरविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन डॉ. राजेंद्र सिंह यांनी केले.
अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष सोनाली जोगदंड होत्या. यावेळी आमदार अमित झनक, वाशिमच्या नगराध्यक्ष लता उलेमाले, सभापती ज्योती गणेशपुरे, जि.प. सदस्य गजानन अमदाबादकर, विकास गवळी, उस्मान गारवे यांच्यासह विभागीय आयुक्त ज्ञानेश्‍वर राजूरकर, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, विभागीय कृषी सहसंचालक शुद्धोधन सरदार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, लघू पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता कोहीरकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, आत्माचे प्रकल्प संचालक अरुण वाघमारे आदी उपस्थित होते.