वाशिममध्ये झाडाला गळफास घेवून युवकाची आत्महत्या

By सुनील काकडे | Updated: June 19, 2024 19:24 IST2024-06-19T19:21:21+5:302024-06-19T19:24:40+5:30

ही घटना १९ जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.

Vashim Youth end his life by hanging himself from a tree | वाशिममध्ये झाडाला गळफास घेवून युवकाची आत्महत्या

(प्रातिनिधीक छायाचित्र)

वाशिम : जिल्ह्यातील विरगव्हाण (ता.कारंजा) येथील गणेश हरिदास तुरक (२८) या युवकाने शेतातील झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना १९ जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.

प्राप्त माहितीनुसार, गणेश तुरक याच्या कुटूंबात ६ एकर शेती आहे. गणेशसह अन्य दोन भावंडांनी चार दिवसांपूर्वी पेरणी केली होती. मात्र, पाऊस न झाल्याने पेरणी उलटली आणि त्याच नैराश्येतून त्याने जिवन संपविल्याची चर्चा घटनास्थळी झाली. गणेश तुरकवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी दाखल फिर्यादीवरून कारंजा शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास ग्रामिण पो.स्टे.चे ठाणेदार प्रवीण खंडारे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.
 

Web Title: Vashim Youth end his life by hanging himself from a tree