शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वाकाटकांची राजधानी धुळीने माखली

By admin | Updated: December 8, 2014 01:37 IST

उपाययोजनांची वानवा : प्रदूषण धोकादायक पातळीच्या पुढे, शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात.

वाशिम : राजे वाकाटकांची राजधानी म्हणून ऐतिहासिक वारसा लाभलेली वाशिम नगरी आजमितीला पुरती भकास झाली आहे. वाढते प्रदूषण व धूलिकणांच्या वाढलेल्या प्रमाणाने यामध्ये अधिकच भर घातली आहे. घरात, कार्यालयांत आणि इतर मानवी वसाहतींत आढळणार्‍या धुळीत मानव आणि प्राण्यांचे केस, कपड्यांचे धागे, कागदाचे कण, शहरात सुरू असलेली बांधकाम, बाहेरच्या मातीतील क्षार आणि स्थानिक पर्यावरणात आढळणारे घटक अशा एक ना अनेक घटकांनी धुराचे लोट निर्माण होत आहेत. यातूनच मानवी आरोग्य धोक्यात आले आहे.
गेल्या दशकभरात शहरात जल आणि ध्वनी प्रदूषणाबरोबर वायुप्रदूषणाने कमालीची पातळी गाठली आहे. विशेषत: शहरात सुरू असणारी बांधकामे, उखळलेले रस्ते वायुप्रदुषणास कारणीभूत आहेत; शिवाय या धूळधाणीत सल्फर डायऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साइडसह प्रदूषकांचे प्रमाण सर्वाधिक असल्याची नोंद महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संबधित कार्यालयात झालेली आहे. गत वर्षभरापासून नगरपालिकेने भुयारी गटार योजना व अंतर्गत जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेतलेले आहे. या कामासाठी शहरातील रस्त्याची चाळण करण्यात आलेली आहे. यातूनच धुळीचे साम्रज्य वाढले असल्याचे दिसून येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे खोदून ठेवलेले रस्ते दुरुस्त करण्यासाठी पालिकेकडे कुठलीच तजवीज नाही. त्यामुळे शहरात धुळीच्या प्रमाणात कमालीची वाढ झाली आहे. धुळीमुळे शहरात श्‍वसनाच्या आजारातही वाढ झालेली आहे. विशेष करून लहान मुले व वृद्धांना या आजारांचा विळखा दिसून येत आहे. या धुळीतूनच सोडियम क्लोराइड, कॅल्शियम क्लोराइड, पोटॅशिएम, ब्रोमाइड व मॅग्नेशिएम क्लोराइड पसरतात. धूलिकण हे वातावरणातील शाश्‍वत घटक नसतात.