शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

विनयभंगप्रकरणी तीन महिन्यांचा कारावास

By admin | Updated: March 8, 2016 02:27 IST

खामगाव न्यायालयाचा निकाल.

खामगाव: खासगी वाहनाने प्रवास करीत असताना २८ वर्षीय कुमारिकेचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीस तीन महिन्याची साधी कैदेची शिक्षा सुनावली आहे. हा निकाल ७ मार्च रोजी खामगाव न्यायालयाने दिला. शिक्षा झालेला आरोपी बुलडाणा जिल्हा परिषदेचा कर्मचारी आहे. बुलडाणा ते खामगाव काळी-पिवळी टॅक्सी क्र.एम.एच.२८-एच.१३४८ ने ३0 जुलै २0११ प्रवास करीत असताना ईश्‍वर लक्ष्मण सूर्यवंशी (वय ४८) रा. सुंदरखेड बुलडाणा याने वाईट उद्देशाने २८ वर्षीय तरुणीचा विनयभंग केला. याबाबत विचारणा केली असता त्याने उलट शिवीगाळ करून चापट- बुक्क्यांनी मारहाण केली व हात पिरगळून जिवे मारण्याची धमकी दिली. यावेळी इतर प्रवाशांनी समजविल्यावरही आरोपीने जुमानले नाही, अशा आशयाची तक्रार बुलडाणा येथील २८ वर्षीय कुमारिकेने खामगाव शहर पोलीस स्टेशनला दिली होती. या तक्रारीवरून शहर पोलिसांनी आरोपी ईश्‍वर लक्ष्मण सूर्यवंशी विरोधात कलम ३५४,५0४,५0६, ३२३ भादंविनुसार गुन्हा दाखल केला व प्रकरण न्यायप्रविष्ट केले. सदर प्रकरणी ७ मार्च रोजी खामगाव न्यायालयात क्र.१ चे न्यायदंडाधिकारी जी.आर. ढेपे यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. सरकार पक्षातर्फे पाच साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांची साक्ष व विशेष सरकारी सहायक अभियोक्ता अजय इंगळे यांचा युक्तिवाद ग्राहय़ मानून आरोपीस भादंवि कलम ३५४ व ३२३ नुसार दोषी ठरविण्यात आले. कलम ३५४ मध्ये ३ महिने साधी कैद व २ हजार रुपये दंड तर कलम ३२३ मध्ये ३ महिने साधी कैद व १ हजार रुपये दंड, अशी शिक्षा आरोपी ईश्‍वर लक्ष्मण सूर्यवंशी यास ठोठावण्यात आली. दंडाची ३ हजार रक्कम न भरल्यास १५ दिवसांची कैद भोगावी लागणार आहे, असेही निकालात नमूद केले आहे.