रिसोड (वाशिम): एका वृध्द महिलेस धाक दाखवून सोने व चांदीचे दागिने पळविणार्या चोरास मुद्देमालासह पकडल्याची घटना ३ नोव्हेंबर रोजी घडली.
तालुक्यातील मोप येथील वयोवृध्द महिला लोणी रोड वरील शेतामध्ये गवत कापण्याचे काम करीत असताना महिलेस मारहाण करून तीच्या शरीरावरील सोने व चांदीचे दागिने जबरीने चोरून नेल्याची घटना ३0 नोव्हेंबर रोजी दुपारी शेतशिवारात घडली होती. या घटनेचा तपास लावण्यासाठी पोलीस यंत्रणा कामाला लागल्यानंतर तपासाअंती गावातील अच्युतराव मोरे यास अटक करून त्याच्याकडील ३ तोळे सोने, ४0 तोळे चांदी असे एकूण ९५000 रूपयाचा माल जप्त केला आहे. आरोपीस अटक करून त्याच्याविरूध्द कलम ३९४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}