जिल्ह्यातील दुकाने आता सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंतच सुरू राहणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:31 IST2021-02-22T04:31:00+5:302021-02-22T04:31:00+5:30

अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी पाचही ...

Shops in the district will now be open from 9 am to 5 pm only! | जिल्ह्यातील दुकाने आता सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंतच सुरू राहणार !

जिल्ह्यातील दुकाने आता सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंतच सुरू राहणार !

अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी पाचही जिल्हाधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार वाशिम जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी रविवारी नवीन नियमावली जारी केली असून, याचे पालन करण्याचे आवाहन केले. जिल्ह्यातील सर्व प्रकारची दुकाने /आस्थापने सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंतच सुरू राहणार आहेत. सर्व प्रकारचे शासकीय कार्यालये (अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळून) हे १५ टक्के किंवा १५ व्यक्ती यापैकी जी संख्या जास्त असेल ती ग्राहय धरुन सुरु राहणार आहेत. सर्व प्रकारची उपाहारगृहे/, हॉटेल्स प्रत्यक्ष सुरु न ठेवता फक्त पार्सल सुविधेस परवानगी राहील. लग्नसमारंभाकरिता २५ व्यक्तींना (वधू व वरासह) परवानगी राहणार आहे. सर्व प्रकारची शैक्षणिक कार्यालये (महाविदयालये, शाळा) येथील अशैक्षणीक कर्मचारी, संशोधन कर्मचारी, वैज्ञानिक यांना ई-माहिती, उत्तरपत्रिका तपासणे, निकाल घोषित करणे आदी कामांकरीता परवानगी राहील. मालवाहतूक ही नेहमीप्रमाणे सुरु राहील आणि वाहतूकसाठी कुठल्याही प्रकारचे निर्बंध राहणार नाही. आंतरजिल्हा बस वाहतुकीस ५० टक्के प्रवासी क्षमतेसह परवानगी राहील.

बॉक्स

रविवारी संपूर्ण संचारबंदी !

यापुढे सर्व प्रकारचे बाजार, बाजारपेठ क्षेत्रातील दुकाने ही सोमवार ते शुक्रवार नियमितपणे सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरु राहतील. आठवड्याअखेर शनिवारी सायंकाळी ५ ते सोमवारी सकाळी ७ पर्यंत असलेल्या संचारबंदीच्या वेळी बाजारपेठ बंद राहतील. आठवडा अखेर असलेल्या संचारबंदीच्या वेळी दुग्धविक्रेते/डेअरी यांची दुकाने ही यापुढे सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत (आठवड्याचे सातही दिवस) नियमितपणे सुरु राहतील.

Web Title: Shops in the district will now be open from 9 am to 5 pm only!