ऑनलाईन प्रश्नमंजुषेला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:44 IST2021-09-03T04:44:39+5:302021-09-03T04:44:39+5:30

३१ ऑगस्ट या विमुक्त दिनी अखिल भारतीय तांडा सुधार समितीने वसंतराव नाईक यांच्या कार्यकर्तृत्वाची ओळख सर्वांना व्हावी, या उद्देशाने ...

Response to the online quiz | ऑनलाईन प्रश्नमंजुषेला प्रतिसाद

ऑनलाईन प्रश्नमंजुषेला प्रतिसाद

३१ ऑगस्ट या विमुक्त दिनी अखिल भारतीय तांडा सुधार समितीने वसंतराव नाईक यांच्या कार्यकर्तृत्वाची ओळख सर्वांना व्हावी, या उद्देशाने प्रश्नमंजुषाचे ऑनलाईन आयोजन केले. ही स्पर्धा २१ ऑगस्ट २०२१ ते २२ जुलै २०२२ अशी वर्षभर चालणार असून दर महिन्याला ५० प्रश्न ऑनलाईन पद्धतीने विचारले जाणार आहेत. पहिल्याच महिन्यातील दोन दिवसांत २५० पेक्षा जास्त स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले.

वसंतराव नाईक यांच्या कार्यावर आधारीत ऑनलाईन प्रश्नमंजुषा आयोजित करण्याचा हा देशातील पहिलाच प्रयोग असल्याची माहिती समितीचे महासचिव नामा बंजारा यांनी दिली. जास्तीत जास्त समाजबांधवांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

.....................

कोट :

वसंतराव नाईक यांच्या जीवनकार्यावर प्रत्येक महिन्यात प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यामुळे समाजात प्रामुख्याने वाचनसंस्कृती रूजेल आणि तरुणांना ग्रंथालयाची ओढ निर्माण होईल.

- डॉ. विजय जाधव

प्रदेशाध्यक्ष, तांडा सुधार समितीचे यांनी व्यक्त केले.

Web Title: Response to the online quiz