शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

वाशिम शहरात पाच दिवसांत ४०० वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2021 12:18 PM

Washim News: पाच दिवसांत वाशिम शहर वाहतूक शाखेने ४०० वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : मास्कचा वापर न करणे आणि ट्रिपल सीट या प्रकरणी १ ते ५ एप्रिल अशा पाच दिवसांत वाशिम शहर वाहतूक शाखेने ४०० वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्कचा वापर करणे तसेच फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे आवश्यक आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष करीत वाशिम शहरात अनेक दुचाकीस्वार मास्कचा वापर करीत नसल्याचे दिसून येते, वाशिम शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाची साखळी तोेडण्यासाठी राज्य शासनाने निर्बंध कठोर केले आहेत. एकिकडे कोरोना संसर्ग वाढत असताना दुसरीकडे अनेकजण विनामास्क तसेच  दुचाकीवर तिबल सीट फिरतात. बाजारपेठेत फिजिकल डिस्टन्सिंगचे पालनही होत नाही. मास्क, रुमालचा वापर न करणाºयांंविरूद्ध शहर वाहतूक शाखेने कारवाईची मोहिम सुरू केली. पाटणी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, अकोला नाका, पोस्ट ऑफिस चौक,  पोलीस स्टेशन चौक, पुसद नाका आदी ठिकाणी कारवाईची मोहिम राबविली जात आहे. १ ते ५ एप्रिल या दरम्यान जवळपास २०० दुचाकीचालकांनी मास्क न वापरल्याप्रकरणी प्रत्येकी ५०० रुपये याप्रमाणे १ लाख रुपये दंड आकारला तसेच तिबल सीट वाहन चालविल्याप्रकरणी २०० जणांना प्रत्येकी २०० रुपये दंड आकारला. यापुढेही चेहऱ्यावर मास्क किंवा रुमाल न बांधता शहरात वाहन चालविताना कुणी आढळून आले तर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरिक्षक नागेश मोहोड यांनी दिला.(प्रतिनिधी)

टॅग्स :washimवाशिमtraffic policeवाहतूक पोलीस