शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जवानाची वाहतूक पोलिसाला मारहाण

By admin | Updated: December 9, 2014 00:55 IST

वाशिम जिल्ह्यातील घटना; गुन्हा दाखल.

वाशिम : ट्रिपलसिट मोटारसायकल चालविणार्‍या आर्मी जवानाला कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसाने थांबविल्याचा राग आल्याने आर्मीच्या जवानाने वाहतूक पोलिसाला शिवीगाळ करून मारहाण केली. ही घटना येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये आज सोमवारला सकाळी ११:३0 वाजता घडली. याप्रकरणी वाशिम शहर पोलिस स्टेशनमध्ये भादंविचे कलम ३५३, ३२३, ५0४, ३४ अन्वये गुन्हा दाखल करून तिघांना अटक करण्यात आली.
प्राप्त माहितीनुसार शहर वाहतूक शाखेमधील पोलिस शिपाई रवी आश्रू खडसे आज ८ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये कर्तव्य पार पाडत होते. दरम्यान, सकाळी ११:३0 वाजता एम.एच. ३७ एन १८७३ क्रमांकाची मोटारसायकल ट्रिपलसिट दिसल्याने खडसे यांनी मोटारसायकल थांबविली. यावेळी वाहतूक पोलिस शिपाई खडसे हे वाहतूक कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल १00 रुपये दंड आकारून कारवाई करीत होते; मात्र मोटारसायकलवरील प्रवासी तथा आर्मीमध्ये कर्तव्यावर असलेला श्रीकिसन नारायण उगले याने खडसे यांना कारवाई न करता आम्हाला सोडून द्या, असे म्हणून शिवीगाळ केली. यावर खडसे यांनी त्याला समज देण्याचा प्रयत्न केला असता उगले याने खडसे यांना मारहाण करून शिवीगाळ केली. हा प्रकार सुरू असताना खडसे याच्या मदतीला वाहतूक पोलिस शिपाई ज्ञानेश्‍वर म्हात्रे धावून आले; मात्र म्हात्रे यांच्या अंगावरही उगले याने हात उगारून शिवीगाळ केली.
कर्तव्यावर असलेल्या वर्दीतील पोलिस शिपायांसोबत सुरू असलेली झटापट पाहण्यासाठी आंबेडकर चौकामध्ये नागरिकांनी एकच गर्दी केली. त्यानंतर शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराम पवार घटनास्थळी पोहचून परिस्थिती नियंत्रणात आणून मोटारसायकलवर असलेले परमेश्‍वर सुभाष उगले, सुखदेव नारायण उगले व आर्मीमधील शिपाई श्रीकिसन नारायण उगले यांना ताब्यात घेतले.
या तिघांवर वाशिम शहर पोलिस स्टेशनमध्ये मोटारसायकल वाहन कायद्याचे उल्लंघन करणे तसेच भादंविचे कलम ३५३, ३२३, ५0४, ३४ अन्वये गुन्हा दाखल करून तिघांना अटक करण्यात आली. या तिघांनाही न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी तिघांनाही जामीन मंजूर केल्याची माहिती पोलिसांनी दिली.