शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
3
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
4
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
5
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
6
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
7
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
8
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
9
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
10
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
11
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
12
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
13
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
14
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
15
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
16
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
17
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
18
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
19
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
20
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
Daily Top 2Weekly Top 5

आता ड्रोनद्वारे होऊ शकेल कीटकनाशक फवारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:48 IST

वाशिम: आता पिकांवरील कीड नियंत्रणात कीटकनाशक फवारणीसाठी शेतकऱ्यांना ड्रोनचा आधारही घेता येऊ शकणार आहे. शासनाच्या निर्देशानुसार ड्रोनद्वारे कीटकनाशक फवारणीचे ...

वाशिम: आता पिकांवरील कीड नियंत्रणात कीटकनाशक फवारणीसाठी शेतकऱ्यांना ड्रोनचा आधारही घेता येऊ शकणार आहे. शासनाच्या निर्देशानुसार ड्रोनद्वारे कीटकनाशक फवारणीचे प्रात्यक्षिक विविध जिल्ह्यांत कृषी विज्ञान केंद्राकडून केले जात आहे. कृषी विज्ञान केंद्र वाशिमनेही २ सप्टेंबर रोजी करडा येथील प्रक्षेत्रावर ड्रोनद्वारे कीटकनाशक फवारणीचे प्रात्यक्षिक सादर केले. अलीकडच्या काळात यांत्रिक शेतीवर अधिक भर दिला जात आहे, त्यामुळे खर्च आणि वेळेतही बचत होत आहे. पूर्वी पेरणीसाठी पारंपरिक पद्धतीत तिफण, बैलजोडी आणि मानवाचा वापर व्हायचा, सिंचनासाठी मोटेचा वापर करताना बैलजोडी व माणूसही लागत असे, तर कापणी आणि मळणीसाठीही मजुरांचा वापर होत असे, आता ही सर्व कामे यंत्राने होत असल्याने मजुरांचा वापर कमी झाला असून, वेळेची व पैशांचीही बचत होत आहे. आता त्यात फवारणीचाही समावेश होणार असून, आता फवारणीसाठी मजुराऐवजी ड्रोनचा वापर केला जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रासह देशभरात याबाबतचे प्रात्यक्षिक कृषी विज्ञान केंद्राकडून केले जात आहे. कृषी विज्ञान केंद्र वाशिमच्या करडा येथील प्रक्षेत्रावरही ड्रोनद्वारे कीटकनाशक फवारणीचे प्रात्यक्षिक २ सप्टेंबरला घेण्यात आले. या कार्यक्रमास कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉक्टर आर. एल. काळे, विषय विशेषज्ञ दिगंबर इंगोले, शुभांगी वाटाणे, प्रमोद देशमुख तसेच प्रगतिशील शेतकरी ज्ञानबा कोरडे, शुभम खडसे, दत्ता काळे, राम देशमुख, आदित्य देशमुख यांच्यासह कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००००००००००००००००००००

आधुनिक उपकरणांचा वापर ही काळाची गरज

शेतीमधील यांत्रिकीकरण व आधुनिक उपकरणांचा वापर ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ. रवींद्र काळे यांनी यावेळी केले. ड्रोनद्वारे फवारणीसाठी लागणाऱ्या औषधी व त्याचे प्रमाण तसेच फवारणी, योग्य पिके याबाबतीत अधिक अभ्यासाची गरज त्यांनी व्यक्त करून शेतीतील नवीन तंत्रज्ञान समजून त्याचा अवलंब करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

००००००००००००००००००००

सोयाबीन, तुरीवर फवारणी

कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर सोयाबीन व तूर या पिकांमध्ये एक हेक्टर क्षेत्रावर ड्रोनद्वारे फवारणीचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. कृषी अर्थशास्त्र प्रमुख इंगोले यांनी शेतकऱ्यांचा शेतीवर होणारा खर्च कमी करण्याच्या उद्देशाने ड्रोनसारख्या तंत्रज्ञानाचा फायदा होऊ शकेल, असे मत व्यक्त केले.