ई-पीक पाहणी प्रक्रियेत सहभागी व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:46 IST2021-09-06T04:46:12+5:302021-09-06T04:46:12+5:30

............... आरोग्य विभागाचा लसीकरणावर भर वाशिम : आरोग्य विभागाकडून नागरिकांच्या कोरोना लसीकरणावर विशेष भर दिला जात आहे. त्यानुषंगाने कोविशिल्डचे ...

Participate in the e-crop inspection process | ई-पीक पाहणी प्रक्रियेत सहभागी व्हा

ई-पीक पाहणी प्रक्रियेत सहभागी व्हा

...............

आरोग्य विभागाचा लसीकरणावर भर

वाशिम : आरोग्य विभागाकडून नागरिकांच्या कोरोना लसीकरणावर विशेष भर दिला जात आहे. त्यानुषंगाने कोविशिल्डचे ४५ हजार व कोव्हॅक्सिनचे २८ हजार डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. अविनाश आहेर यांनी दिली.

................

सिलिंडरचे दर कमी करण्याची मागणी

वाशिम : स्वयंपाकाच्या गॅस-सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. १ सप्टेंबरपासून पुन्हा त्यात २५ रुपयांनी वाढ करण्यात आली. यामुळे सर्वसामान्य कुटुंबांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. दर कमी करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

................

प्रश्नमंजूषा स्पर्धेला प्रतिसाद

वाशिम : हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या १०० व्या स्मृतीदिनानिमित्त अखिल भारतीय तांडा सुधार समितीने ऑनलाइन प्रश्नमंजूषा स्पर्धेचे आयोजन केले. त्यास चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती समितीचे महासचिव नामा बंजारा यांनी दिली.

.................

अनुकूल वातावरण; कपाशी बहरली

वाशिम : चालूवर्षी समाधानकारक पाऊस आणि पोषक वातावरण असल्याने खरिपातील पिकांची स्थिती उत्तम असल्याचे दिसून येत आहे. यासह कपाशीचे पीकही चांगलेच बहरले आहे. त्यामुळे यंदा चांगले उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांमधून वर्तविण्यात येत आहे.

...............

‘तो’ आदेश मागे घेण्याची मागणी

वाशिम : महापारेषणमध्ये कार्यरत तृतीय व चतुर्थ श्रेणीच्या कंत्राटी कामगारांची कपात करण्याचे धोरण वरिष्ठ स्तरावरून अवलंबिण्यात आले आहे. यासंदर्भातील आदेश तत्काळ मागे घ्या, अशी मागणी तांत्रिक ॲप्रेंटिस कंत्राटी कामगार संघटनेकडून करण्यात आली.

................

रस्त्याच्या दुरुस्तीचा प्रश्न प्रलंबित

वाशिम : शहरातील अकोला नाका येथून जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, नगर परिषदेकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. हा प्रश्न प्रलंबित असून न.प.ने लक्ष देण्याची मागणी जोर धरत आहे.

...................

कोंडवाडा सुरू करण्याची मागणी

वाशिम : शहरातील मुख्य रस्त्यांवर मोकाट जनावरे ठिय्या मांडून बसत असून वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. ही बाब लक्षात घेऊन बंद असलेला कोंडवाडा सुरू करावा, अशी मागणी माळी युवा मंचचे जिल्हाध्यक्ष नागेश काळे यांनी शनिवारी न.प.कडे निवेदनाव्दारे केली.

Web Title: Participate in the e-crop inspection process