शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वृद्ध कलावंतांचे प्रस्ताव निकाली

By admin | Updated: March 9, 2016 02:07 IST

२0१२-१३ ते २0१४-१५ या वर्षातील १८0 प्रस्तावांना मान्यता; बँक खाते क्रमांकाची माहिती मागविली.

संतोष वानखडे / वाशिम
आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात उदरनिर्वाहाकरिता वृद्ध कलावंतांना मानधन मिळण्याच्या दृष्टिकोनातून, जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने गतवर्षी शासनदरबारी पाठविलेल्या १८0 प्रस्तावांना शासनाकडून हिरवी झेंडी मिळाली आहे.
साहित्य व गीत-गायन, भजन, पोवाड्याच्या माध्यमातून समाजात जनजागृतीचे कार्य करण्याचा विडा अनेक साहित्यिक व कलावंतांनी उचलला आहे. समाजविघातक प्रवृत्ती, समाजातील वाईट प्रथा, बालविवाह, हुंडाबळी, स्त्रीभ्रूण हत्या, महिला अत्याचार आदी बाबींवर साहित्य व भजन, गीतगायन, पोवाड्याच्या माध्यमातून प्रहार चढविणार्‍या साहित्यिक व कलावंतांना वृद्धापकाळात आर्थिक मदतीचा हात मिळावा म्हणून शासनातर्फे मानधन दिले जाते. शासनाने वृद्ध कलावंत व साहित्यिकांचे अ, ब व क दर्जा असे प्रकार पाडून मानधन निश्‍चित केले होते. अनुदानाचा लाभ घेण्यासाठी १५ ते २0 वर्षे साहित्य व गीत-गायन, भजन, पोवाडा या क्षेत्रात कार्य करणार्‍या वृद्ध कलावंताने पंचायत समितीमार्फत जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडे प्रस्ताव सादर करणे बंधनकारक आहे. या प्रस्तावांमधून जिल्हास्तरीय समिती पात्र लाभार्थ्यांंची निवड करते. पालकमंत्र्यांनी नियुक्त केलेले प्रतिनिधी अध्यक्ष म्हणून तर सदस्य सचिव म्हणून जिल्हाधिकार्‍यांनी नियुक्त केलेले प्रतिनिधी या निवड समितीचे कामकाज पाहतात. निवड समितीने पात्र ठरविलेली लाभार्थ्यांंची यादी समाजकल्याण विभाग शासनाकडे सादर करते. २0१२-१३ ते २0१४-१५ या तीन वर्षात एकूण १८0 वृद्ध कलावंतांची निवड करून समाजकल्याण विभागाने शासन दरबारी प्रस्ताव पाठविले होते. फेब्रुवारीच्या अखेरीस या प्रस्तावांना मंजुरात मिळाली. आता बँक खाते क्रमांक आणि हयातीचा दाखला पात्र लाभार्थींंनी पंचायत समिती प्रशासनाला देणे अपेक्षित आहे. पंचायत समिती स्तरावरून पात्र लाभार्थींंना अनुदान दिले जाते, असे समाजकल्याण विभागाने स्पष्ट केले.
२0११-१२ या वर्षाअखेरीस वाशिम जिल्ह्यात क वर्गवारीत ३४३ वृद्ध कलावंत आहेत. वाशिम ७७, मालेगाव ३५, रिसोड ६0, मंगरुळपीर ५७, मानोरा ५४, कारंजा ६0 अशी वृद्ध कलावंतांची तालुकानिहाय संख्या आहे. आता तीन वर्षातील रखडलेली यादी मंजूर झाल्याने पात्र लाभार्थींच्या संख्येत बरीच वाढ झाल्याचे दिसून येते.