शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आत्महत्या अपात्रतेचे प्रमाण निम्म्याहून अधिक!

By admin | Updated: December 18, 2015 02:31 IST

जाचक निकषामुळे अपात्रतेचे प्रमाण जास्त; मंगरुळपीर, कारंजा तालुक्यातील स्थिती.

कारंजा/ मंगरुळपीर : वाशिम जिल्ह्यात दुष्काळ, नापिकी आणि कर्जबाजारीमुळे शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. याबाबत सहानुभूतीची अपेक्षा असताना शासनाच्या विचित्र निकषामुळे निम्म्याहून अधिक आत्महत्या शासकीय मदतीस अपात्र ठरत असल्याचे मंगरुळपीर आणि कारंजा तालुक्यातील शेतकरी आत्महत्यांच्या संदर्भातील आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. मंगरुळपीर तालुक्यात २00१ ते २0१५ दरम्यान दोनशे अठरा शेतकर्‍यांनी नापिकी, कर्जबाजारी किंवा शेतीसंदर्भातील इतर समस्यांमुळे मृत्यूला कवटाळले. तथापि, त्यापैकी केवळ ६८ शेतकरी आत्महत्या शासकीय मदतीसाठी पात्र ठरल्या, तर तब्बल १४३ आत्महत्या अपात्र ठरल्या असून, इतर सात आत्महत्या प्रलंबित आहेत किंवा वगळण्यात आल्या आहेत. कारंजा तालुक्यात २00१ ते २0१५ दरम्यान ३१0 शेतकर्‍यांनी मृत्यूला कवटाळले. त्यापैकी केवळ ११७ आत्महत्या पात्र ठरल्या, तर तब्बल १८३ आत्महत्या अपात्र ठरविण्यात आल्या असून, इतर आठपैकी ५ आत्महत्या चौकशीत आणि उर्वरित पाच प्रलंबित किंवा काही कारणास्तव वगळण्यात आल्याची माहिती आहे. त्यातही गत चार वर्षांंंंतील आकडेवारी अधिक विदारक असून, कारंजा तालुक्यात मागील चार वर्षांंंतील ८६ आत्महत्यांपैकी केवळ ३0 आत्महत्या पात्र, ठरल्या, तर मंगरुळपीर तालुक्यातील ६0 पैकी २९ आत्महत्या पात्र ठरल्या. एकत्रित असलेल्या शेतकरी कुटुंबातील कर्त्याव्यक्तीसह इतर सदस्य कुटुंबाकडे असलेल्या शेतीत राबराब राबून कुटुंबाचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करीत असतो. तथापि, मागील काही वर्षांंंंत नापिकी, अतवृष्टी, गारपीट, पीक चोरी, बँक, कर्ज, सावकारी कर्ज आदी कारणांसहच शेतमालाबाबत शासनाचे धोरण या कारणांमुळे शेतकरी पार खचला आहे. घाम गाळून रुजविलेल्या बियांचे योग्य मोल होत नाही, निसर्ग साथ देत नाही. त्यामुळे करावे तरी काय, हा प्रश्न त्यांच्यापुढे सतत उभा राहत आहे.