शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाइन शिक्षणासाठी विद्यार्थ्यांच्या हाती पुन्हा मोबाइल, लॅपटॉप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 12:05 IST

Online learning शिक्षणासाठी विद्यार्थ्यांच्या हाती पुन्हा लॅपटॉप, मोबाइल, टॅब आल्याचे पाहावयास मिळते.

- संतोष वानखडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने पाचवी ते बारावीचे वर्ग बंद करण्यात आले असून, गत आठवड्यापासून विद्यार्थ्यांना ऑनलाइनशिक्षणाचे धडे दिले जात आहेत. ऑनलाइनशिक्षणासाठी विद्यार्थ्यांच्या हाती पुन्हा लॅपटॉप, मोबाइल, टॅब आल्याचे पाहावयास मिळते.सन २०२०मध्ये मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसगार्चा प्रादुर्भाव वाढल्याने शाळा बंद होत्या. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाइन पद्धतीने शिक्षण देण्यात आले. दरम्यान, ऑक्टोबर महिन्यापासून कोरोनाचा आलेख खाली आल्याने नोव्हेंबर महिन्याच्या २३ तारखेला इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग, तर २७ जानेवारीपासून इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले. यादरम्यान जिल्ह्यातील एकाही विद्यार्थ्याला कोरोना विषाणू संसर्ग झाला नाही. दरम्यान, गत आठवड्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने पुढील आदेशापर्यंत पाचवी ते बारावीचे वर्ग बंद करण्यात आले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून पुन्हा विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शिकविण्याच्या सूचना शिक्षण विभागाने संबंधित शाळा प्रशासनाला दिल्या. त्यानुसार ऑनलाइन पद्धतीने शिक्षण देण्यात येत आहे. ऑनलाइन शिक्षणासाठी विद्यार्थ्यांच्या हाती पुन्हा मोबाइल, टॅब, लॅपटॉप आल्याचे पाहावयास मिळत आहे. जिल्ह्यात नववी ते बारावीपर्यंत शिक्षण देणाऱ्या ३६३ शाळा असून, येथे ८२ हजार १५१ विद्यार्थी संख्या आहे. पाचवी ते आठवीपर्यंत शिक्षण देणाऱ्या ८०६ शाळा असून, येथे ८१ हजार ५१८ विद्यार्थी संख्या आहे. 

वरिष्ठांच्या सूचनेनुसार पाचवी ते आठवीचे वर्ग विद्यार्थ्यांसाठी बंद करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शिकविण्यात यावे, अशा सूचना मुख्याध्यापक, शिक्षकांना देण्यात आल्या. जिल्हा परिषद शाळेतील जवळपास ५८ टक्के विद्यार्थ्यांना सध्या ऑनलाइन पद्धतीने शिकविण्यात येत आहे.- अंबादास मानकरशिक्षणाधिकारी (प्राथमिक) वाशिम.

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने नववी ते बारावीचे वर्ग विद्यार्थ्यांसाठी बंद करण्यात आले. शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून पूर्वीप्रमाणेच विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शिकविण्यात यावे, अशा सूचना मुख्याध्यापक, शिक्षकांना देण्यात आल्या. त्यानुसार ऑनलाइन पद्धतीने शिकविण्यात येत आहे.- रमेश तांगडेशिक्षणाधिकारी (माध्यमिक) वाशिम.

टॅग्स :washimवाशिमonlineऑनलाइनStudentविद्यार्थीEducationशिक्षण