मालेगाव येथे महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ युवा शाखेची कार्यकारिणी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:30 IST2021-09-02T05:30:46+5:302021-09-02T05:30:46+5:30

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी उद्धव महाराज जवंजाळ तर प्रमुख उपस्थिती म्हणून वारकरीबाबा, जनार्दन खंदारे, विठ्ठल ठाकरे, गजानन ...

Maharashtra State Warkari Mahamandal Youth Branch Executive Committee announced at Malegaon | मालेगाव येथे महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ युवा शाखेची कार्यकारिणी जाहीर

मालेगाव येथे महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ युवा शाखेची कार्यकारिणी जाहीर

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी उद्धव महाराज जवंजाळ तर प्रमुख उपस्थिती म्हणून वारकरीबाबा, जनार्दन खंदारे, विठ्ठल ठाकरे, गजानन वाझुळकर , संजय लहाने, गोविंद गवळी, अवलिया संस्थान काळामाथा अध्यक्ष रामेश्वरआप्पा गोंडाळ, अरुण बळी, किरण शिंदे, विभागीय अध्यक्ष संदीप पोफळे शास्त्री आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीप मुंदडा यानी केले तर संचालन किरण महाराज शिंदे यांनी केले. आभार प्रदर्शन पश्चिम विदर्भ विभाग प्रमुख तथा युवा अध्यक्ष वाशीम संदीप महाराज पोफळे शास्त्री यांनी केले. यावेळी अध्यक्ष म्हणून ज्ञानेश्वर वाढणकर, उपाध्यक्ष बबनराव दहात्रे, कार्याध्यक्ष दिलीप मुंदडा, सचिव गणेश अर्धापूरकर, सांस्कृतिक प्रमुख शंकर देशमुख तथा सदस्य पवन लांडकर यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी तालुक्यातील वारकरी मंडळी उपस्थित हाेती.

010921\img-20210831-wa0065.jpg

नियुक्ती

Web Title: Maharashtra State Warkari Mahamandal Youth Branch Executive Committee announced at Malegaon