शहरं
Join us  
Trending Stories
1
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
2
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
3
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
4
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
5
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
6
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
7
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
8
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
9
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
10
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
11
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
12
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
13
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
14
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
15
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
16
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
17
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
18
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
19
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
20
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

मंगरुळपीर शहरातील निराधार चिमुकल्या मुलींना मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:47 IST

काही दिवसांपूर्वी दोन चिमुकल्या मुलींना मदतीचा हात हवा असल्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्ते यांनी सोशल मीडियातून केले होते. प्रसारमाध्यमांनीही ...

काही दिवसांपूर्वी दोन चिमुकल्या मुलींना मदतीचा हात हवा असल्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्ते यांनी सोशल मीडियातून केले होते. प्रसारमाध्यमांनीही दखल घेऊन सेवाभावींनी वडिलांचे छत्र आणि आईच्या मायेची सावली नसलेल्या अशोकनगर वस्तीतील त्या मुलींना मदतीचे आवाहन केले होते. या आवाहनानंतर काही सेवाभावींनी मदतही केली. चिमुकल्या मुलींना मदतीची गरज असल्याचे कळताच कारंजा येथील रहिवाशी असलेले बिरसा क्रांती दल वाशिमचे राजेश मस्के यांनी गहू घेऊन थेट मंगरुळपीरला त्या कुटुंबीयांना देण्यासाठी पोहोचले, तसेच आपले सहकारी असलेल्या शिक्षक मित्रांनीही त्या कुटुंबीयांची भेट घेण्याविषयी चर्चा केली. लगेच सहकाऱ्यांच्या हाकेला ओ देत मंगरुळपीरचे गटशिक्षणाधिकारी सुभाष पवने यांनीही हजेरी लावून त्या मुलींची आस्थेने विचारपूस केली आणी रोख मदतही केली. यावेळी केंद्रप्रमुख, जि. प. सदस्य चिंतामण खुळे, सुदाम भोडने, जीवन हगवणे, जामदरा येथील कैलास ढोके, इरफान शेख, धम्मा कांबळे, राजेश मस्के आदींची उपस्थिती होती.

००००००००००००

आठवीपर्यंतच्या शिक्षणाची सोय

अशोकनगर येथील डाके कुटुंबांतील चिमुकल्या मुलींना केवळ आर्थिक मदतच दानशूरांनी केली नाही, तर आठवीपर्यंत त्या मुलींचे मोफत शिक्षणाची सोय लावून शैक्षणिक साहित्यही पुरविण्याचा संकल्पही गटशिक्षणाधिकारी सुभाष पवने यांच्यासह इतर शिक्षकांनी केला आहे, तसेच सर्व शिक्षकांनी या चिमुकल्या मुलींना मदत करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही केले.