शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
2
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
3
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
4
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
5
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनी सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
6
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
7
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
8
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
9
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
10
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
11
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
12
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
13
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
14
GT vs MI : कोण आहे Danish Malewar? रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सनं विदर्भकारावर खेळला मोठा डाव; पण...
15
सौदीच्या एका शब्दाखातर पाकिस्तानने मोडला ४२ हजार कोटींचा करार! सुदानला मोठा झटका!
16
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
17
अमेरिकेची सात विमाने शस्त्रास्त्रांसह इस्लामाबादमध्ये दाखल; इराणच्या राष्ट्रपतींनी केली 'ही' मोठी मागणी!
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? 
19
नेपाळमध्ये राहणं झालं महाग! बालेन सरकारचा 'तो' एक नियम आणि ५० लाख मधेशींची झोप उडाली!
20
"देवेंद्र फडणवीस पूर्वी असे नव्हते, पण आता ते फक्त...", आरक्षणाच्या मुद्द्यावरून अंजली दमानिया यांची मुख्यमंत्र्यांवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यूवर नियंत्रणासाठी आरोग्य विभाग सरसावला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 14:56 IST

२ नोव्हेंबर रोजी कनिष्का सुभाष रोकडे (वय ३ वर्षे) या चिमुकलीचा डेंग्यूची लागण झाल्याने मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कधनज बु : येथुन जवळच असलेल्या राहटी येथे चालू महिन्यात डेंग्यूचे सहा रुग्ण आढळले. त्यातील एका तीन वर्षाच्या चिमुकलीचा २ नोव्हेंबरला मृत्यू झाला. यामुळे मोठी खळबळ माजली असून डेंग्यूवर नियंत्रणासाठी आरोग्य विभागाकडून युद्धस्तरावर उपाययोजना केल्या जात असल्याचे दिसून येत आहे.याबाबत अधिक माहिती अशी, की चालू महिन्यात २ नोव्हेंबर रोजी कनिष्का सुभाष रोकडे (वय ३ वर्षे) या चिमुकलीचा डेंग्यूची लागण झाल्याने मृत्यू झाला. यासोबतच अन्य पाच जणांनाही डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यातील तीन रुग्णांची प्रकृती चांगली असून ते सद्या राहटी येथे आहेत; परंतु वैष्णवी संजय अवघड (वय २२ वर्षे), मालती मनोहर ठाकरे (वय ६० वर्षे) या दोन रुग्णांवर नागपूरच्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकारामुळे राहटी या गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान, डेंग्यूवर नियंत्रण मिळविण्याकरिता प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर म्हसके यांच्या मार्गदर्शनाखाली ३ नोव्हेंबरपासून गावात कंटेनर सर्वेक्षण, टेमीफॉस राऊंड, जलदताप सर्वेक्षण, रक्त नमुने गोळा करणे, पडीक विहिरीमध्ये गप्पीमासे सोडणे, डास प्रतिबंधक धुर फवारणी आदी उपाययोजना युद्धस्तरावर राबविण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.

राहटी येथे डेंंग्युची लागण झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर तत्काळ धनज बु. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने सर्व आवश्यक उपाययोजना राबविण्यात आल्या असून सद्य:स्थितीत रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांची प्रकृती चांगली आहे.- डॉ. सागर मस्केवैद्यकीय अधिकारी, धनज बु.

डेंग्युचे रुग्ण आढळल्यानंतर राहटी गावात पाणी नमुने तपासणी, डास प्रतिबंधक धुर फवारणी, सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांची स्वच्छता आदी उपाययोजना करण्यात आल्या. यासह घरोघरी जावून संशयित रुग्णांची तपासणी देखील सुरू आहे.- डॉ. किरण जाधवतालुका वैद्यकीयअधिकारी, मानोरा

टॅग्स :washimवाशिमdengueडेंग्यू