शहरं
Join us  
Trending Stories
1
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
2
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
3
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
4
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा 'झालमुरी स्टॉल', पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
5
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
6
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
7
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
8
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
9
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
10
भारताच्या माजी क्रिकेटपटूची राजकीय मैदानात दमदार एंट्री, बड्या नेत्याविरोधात घेतली मोठी आघाडी
11
'या' स्टॉकनं केलं मालामाल! ५ वर्षांत १४००% चं छप्परफाड रिटर्न, आज पुन्हा अपर सर्किट
12
वैशाख अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: राहु काळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, चंद्रोदयाची वेळ!
13
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
14
UPSC टॉपर घडवणाऱ्या शिक्षिकेचे विद्यार्थ्याकडून अपहण; १.९० कोटी लुटून हॉस्पिटलमध्ये लपला, कारण समोर
15
'सैराट'फेम अरबाज शेखने केला निकाह, कोण आहे 'सल्या'ची पत्नी? रिंकू राजगुरुनेही केली कमेंट
16
"'ट्विंकल-ट्विंकल' शिकण्यासाठी २.५ लाख द्यायचे?"; सिनियर केजीची फी पाहून पालक शॉक
17
दोन सिलिंडर, एकदाच रांगेत राहून भरा, दुप्पट फिरा...! या कंपनीने सीएनजीमध्ये सात सीटर कार लाँच केली
18
बंगालमध्ये सायनी घोष यांचं गाणंच ठरलं गेमचेंजर; भाजपला थेट सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचवलं
19
'खुल्लम खुल्ला प्यार' आता बंद! 'गर्लफ्रेंड कल्चर' BCCIला अमान्य, 'हे' ४ भारतीय काय करणार?
20
नक्कल करायलाही अक्कल लागते! रोहितच्या स्टाईलमध्ये बाबरचं सेलिब्रेशन; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Daily Top 2Weekly Top 5

भावी शिक्षकांनी दिली पात्रता परीक्षा

By admin | Updated: December 15, 2014 00:47 IST

३१ परीक्षा केंद्रांवर पार पडली परीक्षा : पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात.

वाशिम : गतवर्षीपासून राज्य शासनाने राज्यभरातील सर्व भावी शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टी.ई.टी.) अनिवार्य केली आहे. जिल्हाभरातून एकूण सात हजार ४७ परीक्षार्थ्यांनी यासाठी नोंदणी केली होती. १४ डिसेंबर रोजी वाशिम शहरातील ३१ परीक्षा केंद्रावरून परीक्षा पार पडली. यावेळी सर्वच परिक्षा केंद्रावर पोलीसांनी तगडा बंदोबस्त तैनात केला होता. गतवर्षी १0 हजार ८00 परीक्षार्थींनी टीईटी परीक्षा दिली होती. शिक्षणाच्या अधिकार अधिनियमानुसार इयत्ता पहिली ते पाचवी तसेच इयत्ता सहावी ते आठवीला अध्यापन करणार्‍या शिक्षण सेवक उमेदवाराला सीईटी परीक्षेपूर्वी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य केले आहे. ही शिक्षक पात्रता परीक्षा १४ डिसेंबर २0१४ रोजी वाशिम शहरातील ३१ परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. या परीक्षेसाठी ३१ केंद्र संचालक, २३५ पर्यवेक्षक, ३१ सहायक पर्यवेक्षक तर पाच झोन ऑफिसर नियुक्त करण्यात आले होते. प्राथमिक शिक्षकांसाठी असणार्‍या पहिल्या पेपरसाठी ४६८३ परीक्षार्थी तर उच्च प्राथमिक शिक्षकांसाठी असणार्‍या पेपर दोनसाठी २३६४ परीक्षार्थींची नोंद केली होती. पहिला पेपर सकाळी १0.३0 वाजता सुरू झाला.दरम्यान सदर पेपर साठी सकाळी ९ वाजतापासून विद्यार्थ्यांनी परिक्षा केंद्रावर उपस्थिती लावली होती. तर दुसर्‍या पेपरसाठीही सर्वच परिक्षा केंद्र दुपारी १ वाजताच्या सुमारासच हाऊसफुल्ल दिसून येत होते. परिक्षेदरम्यान शांतता व सुव्यवस्था ५ठेवण्यासाठी पोलीसांनी तगडा बंदोबस्त तैनात केला होता. त्यामुळे सर्वच परीक्षा केंद्रावर शांततेत ही परीक्षा पार पडली. कुठेही अनुचित प्रकार घडल्याचे ऐकीवात नाही.