फळ, भाजीपाला विक्रेत्यांचीही होणार कोरोना चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 16:34 IST2021-02-21T16:34:31+5:302021-02-21T16:34:38+5:30

Corona Test सावधगिरीचा उपाय म्हणून फेरीवाले, फळ व भाजीविक्रेत्यांचीदेखील कोरोना चाचणी केली जाणार आहे.

Fruit and vegetable sellers will also be corona tested | फळ, भाजीपाला विक्रेत्यांचीही होणार कोरोना चाचणी

फळ, भाजीपाला विक्रेत्यांचीही होणार कोरोना चाचणी

वाशिम :  कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आठवडी बाजारासाठी विकेंद्रित स्वरूपात जागा उपलब्ध करून दिली असून, वाशिम शहरातील पाटणी चौकस्थित भाजीबाजार अन्यत्र हलविण्यात आला. दरम्यान, सावधगिरीचा उपाय म्हणून फेरीवाले, फळ व भाजीपाला विक्रेत्यांचीदेखील कोरोना चाचणी होणार असून, सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन वाशिमचे तहसिलदार विजय साळवे यांनी रविवारी केले.
वाशिम जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्याचा प्रयत्न म्हणून उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी प्रशासकीय यंत्रणेला दिल्या. भाजीपाला, फळे विक्रेत्यांना विकेंद्रित स्वरूपात जागा उपलब्ध करून देऊन एकाच ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना करावी अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. त्याअनुषंगाने वाशिम येथील पाटणी चौकातील भाजीबाजारासाठी विकेंद्रित स्वरूपात जागा उपलब्ध करून देण्यात आली. पाटणी चौकातील भाजीबाजार बंद केला असून, काटा रोड, लाखाळा रोड, कृषी उत्पन्न बाजार समिती आदी ठिकाणी विक्रेंदीत स्वरुपात भाजीबाजार भरविण्यात आला. बाजार समिती आवारातील भाजीबाजाराला रविवारी उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत, तहसिलदार विजय साळवे, ठाणेदार ध्रूवास बावनकर यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी मास्क न वापरणाºया काही विक्रेत्यांविरूद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली. दरम्यान, सावधगिरीचा उपाय म्हणून फेरीवाले, फळ व भाजीविक्रेत्यांचीदेखील कोरोना चाचणी केली जाणार आहे. यापुढे कोरोना चाचणी केल्याचे प्रमाणपत्र या विक्रेत्यांना सोबत बाळगावे लागणार आहे. कोरोना चाचणी न करणाºयांना भाजीपाला, फळ व किरकोळ वस्तू विकता येणार नाहीत. वाशिम शहरातील फेरीवाले, फळ व भाजीपाला विक्रेत्यांनी कोरोना चाचणी करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन तहसिलदार साळवे यांनी केले.

Web Title: Fruit and vegetable sellers will also be corona tested