शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
2
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
3
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
4
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
5
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
6
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
7
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
8
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
9
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
10
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
11
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
12
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
14
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
15
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
16
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
17
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
18
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
19
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
20
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई

पिकांच्या नुकसानभरपाईकडे खिळली शेतकऱ्यांची नजर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 12:36 PM

अंतीम अहवाल जिल्हा प्रशासनाने शनिवारी विभागीय आयुक्तांकडे पाठविला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात २७ आॅक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे अडीच लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या पिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाले. नुकसानभरपाईपोटी संबंधित बाधीत शेतकºयांना १९७ कोटी ९८ लाख ३९ हजार ८६२ रुपयांच्या निधीची गरज असल्याचा अंतीम अहवाल जिल्हा प्रशासनाने शनिवारी विभागीय आयुक्तांकडे पाठविला आहे. त्यामुळे आता प्रत्यक्ष नुकसानभरपाई कधी मिळणार, याकडे शेतकºयांची नजर खिळली आहे.जिल्ह्यात २७ आॅक्टोबरपासून सलग ९ दिवस अवकाळी पावसाने अक्षरश: थैमान घातले. दरम्यान, कृषी व महसूल विभागाने आपापल्या स्तरावर नुकसानाची पाहणी व पंचनामे केले. ‘डाटा एन्ट्री’दरम्यान सर्व पंचनाम्यांची पुर्नपडताळणी करण्यात आली. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने विभागीय आयुक्तांकडे नुकसानाचा अंतीम अहवाल सादर केला. त्यानुसार, जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे २ लाख ५९ हजार ७०१ हेक्टरवरील सोयाबिन, २० हजार ६३५ हेक्टरवरील कपाशी, १३३३ हेक्टरवरील तूर, २२२२ हेक्टरवरील भाजीपाला, १७४ हेक्टरवरील पपई, १११ हेक्टरवरील हळद, ४९४ हेक्टरवरील संत्रा, २७ हेक्टर लिंबू, ६५ हेक्टरवरील डाळींबाचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचे दर्शविण्यात आले असून २ लाख ५० हजार ३५० बाधीत शेतकºयांना नुकसानभरपाईपोटी १९७ कोटी ८९ लाख ३९ हजार ८६२ रुपयांच्या निधीची गरज असल्याचे कळविण्यात आले आहे. त्यामुळे आता प्रशासकीय पातळीवरील प्रक्रिया पूर्ण झाल्याने शासनस्तरावरून नेमकी मदत कधी मिळणार, याकडे जिल्हाभरातील बाधीत शेतकºयांची नजर खिळली आहे.  जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे जिरायत पिकाखालील २लाख ४६ हजार ३९४, बागायती पिकाखालील ३५२२; तर फळपिकाखालील ४३४ अशा एकूण २ लाख ५० हजार ३५० शेतकºयांच्या २ लाख ८७ हजार १६५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंतीम अहवाल विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला आहे. शासकीय नियमानुसार बाधीत शेतकºयांना मदतीसाठी १९७.८९ कोटी रुपयांची गरज आहे.- शैलेश हिंगेनिवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी