शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी महिलांनाच केले जाते पुढे; पुरुषांचे मात्र हात वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 12:16 IST

Family planning surgery News जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत केवळ सात पुरुषांनी नसबंदी केल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: कुटुंब नियोजनासाठी महिलांप्रमाणेच पुरुषांनीही स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन शस्त्रक्रिया करून घ्यावी, याबाबत शासनस्तरावरून सातत्याने जनजागृती केली जात आहे. प्रत्यक्षात मात्र आजही कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी महिलांनाच पुढे केले जात असल्याचे चित्र आहे.  जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत केवळ सात पुरुषांनी नसबंदी केल्याची माहिती प्राप्त झाली आहे.दिवसेंदिवस वाढत चाललेल्या लोकसंख्येवर आळा घालण्याकरिता शासनाकडून विविध स्वरूपातील योजना आखल्या जात आहेत. कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी गेल्या काही वर्षांत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापरदेखील व्हायला लागला आहे. असे असले, तरी पुरुषांच्या मानसिकतेत कुठलाही बदल झाला नसल्याचे वास्तव आकडेवारीवरून समोर येत आहे. वाशिम जिल्ह्यात सन २०१९ मध्ये ३१८५ महिलांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली. यावर्षी पुरुषांचा आकडा केवळ तीन आहे; तर २०२० मध्ये २२५२ महिलांच्या तुलनेत चार पुरुषांनी नसबंदी करून घेतल्याची माहिती मिळाली. दरम्यान, आरोग्य विभागाकडून पुरुषांच्या नसबंदीचे प्रमाण वाढण्यासंबंधी पोस्टरबाजीव्यतिरीक्त ठोस अशी जनजागृती केली जात नसल्यानेच पुरुषांच्या कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येत आहे.  

काय आहेत गैरसमज?

पुरुष नसबंदी ही तुलनेने सोपी व सुरक्षित अशी शस्त्रक्रिया आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातही शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे; मात्र यासंबंधी पुरुषांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरसमज आहेत. त्यात प्रामुख्याने शस्त्रक्रिया केल्यानंतर नपुंसकता येते, ओझे उचलता येत नाही, यासारख्या गैरसमजांचा समावेश आहे.

ग्रामीणप्रमाणेच शहरी भागातही पुरुष नसबंदीबाबत अनेक गैरसमज आहेत. आरोग्य विभागाकडून पुरुषांनीही शस्त्रक्रिया करून घेण्याबाबत आवाहन केले जाते; मात्र प्रभावी जनजागृती केली जात नसल्याने प्रमाण कमी आहे.- मनिष डांगे

लोकसंख्या नियंत्रणासाठी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. महिलांप्रमाणेच पुरुषांनीही यासाठी पुढे यावे, याबाबत वेळोवेळी आवाहन केले जाते. त्याअनुषंगाने जाहिरातबाजीही करण्यात येते; मात्र त्यास अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. पुरुषांनी गैरसमज न बाळगता पुढे यायला हवे.- डॉ. अविनाश आहेर,  जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम

 

टॅग्स :washimवाशिमFamilyपरिवार