शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
2
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
3
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
4
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
5
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
6
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
7
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
8
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
9
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
10
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
11
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
12
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
13
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
14
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
15
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
16
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
17
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
18
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
19
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
20
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
Daily Top 2Weekly Top 5

कळंबेश्वर धरणातून पाण्याचा अपव्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 14:58 IST

अवैधरित्या पाणी बाहेर सोडल्या जात असल्याचा आरोप करीत कळंबेश्वर येथील शेतकऱ्यांनी लघु सिंचन विभागाच्या कार्यालयात ९ डिसेंबरला धडक देऊन चर्चा केली.

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : मालेगाव तालुक्यातील कळंबेश्वर धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत असतानाही, याकडे संबंधित यंत्रणेचे लक्ष जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. अवैधरित्या पाणी बाहेर सोडल्या जात असल्याचा आरोप करीत कळंबेश्वर येथील शेतकऱ्यांनी लघु सिंचन विभागाच्या कार्यालयात ९ डिसेंबरला धडक देऊन चर्चा केली.अवकाळी पावसाने बहुतांश धरणांमध्ये जलसाठा असून, त्याचे योग्य नियोजन केले नाही तर उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मालेगाव तालुक्यातील कळंबेश्वर धरणातील पाणी अवैधरित्या बाहेर सोडल्या जात आहे. या धरणातून पांगरी कुटे, एकांबा, खेरडी, कळंबेश्वर, डही आदी ठिकाणी लोक पिण्याकरता तसेच शेतीकरिता पाणी वापरतात. मात्र सध्या त्यातून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. यासंदर्भात कळंबेश्वर येथील शेतकरी ओम चतरकर, शंकर चतरकर, दत्तराव चतरकर, भागवत चतरकर, संतोष चतरकर, पुंजाजी नारायण चतरकर, सुनील शंकर गवई, विश्वास वानखडे, राजू डोके, शेषराव वंजारे, संतोष शिंदे, शालिक धनगर आदींनी कार्यालय गाठून समस्या मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र कार्यालयात कोणताही जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याने शेतकऱ्यांना खाली हात परतावे लागले. कळंबेश्वर धरणातील पाणी वाया जात असल्यासंदर्भात मला काही शेतकºयांकडून समजले. यासंदर्भात आम्ही प्रत्यक्ष ठिकाणावर जाऊन वाया जाणारे पाणी ताबडतोब बंद करू.- आर.बी. तायडेअभियंता लघु सिंचन उपविभागधरणातून पाणी वाया जात असल्याबाबत तेथील अधिकाºयांना वारंवार सूचना दिल्या असून अद्यापपर्यंत याबाबत कोणतीही हालचाल त्यांनी केली नाही. पाणी असेच वाहत राहिले तर आम्ही सर्व गावकरी मिळून तीव्र आंदोलन करू.-अनिता शंकर चतरकरसरपंच, कळंबेश्वर

टॅग्स :washimवाशिमDamधरण