शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

घन ओथंबून येती अन् हुरहूर लावून जाती!

By admin | Updated: July 6, 2014 23:28 IST

आता अपेक्षा पुनर्वसूकडून : सर्वांच्या नजरा आकाशाकडे

मेहकर : पावसाळ्यातील दुसरा महिना उजाडुनही पावसाने हजेरी लावली नाही. आजपासून पुनर्वसू नक्षत्र लागले असून, सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. गत दोन दिवसांपासून तर घन ओथंबून येताहेत आणि सर्वांना पावसाची हुरहूर लावून जात आहेत. पावसाच्या दडीमुळे दिवसेंदिवस पर्यावरणाचे संतुलण बिघडत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
पावसाळ्यातील जून महिन्यात मृग व आद्रा ही दोन्ही नक्षत्रे पुर्णत: कोरडी गेली. तर जुलै महिन्यात ६ जुलै पासून पुनर्वसू नक्षत्र सुरू झाले असून, या नक्षत्राच्या मुहूर्तावर आकाशात फक्त ढग दाटुन येत आहेत. मात्र, पावसाची सरही कोसळली नाही. यंदा पुनर्वसू नक्षत्राचे गर्दभ हे वाहन असून, गर्दभ जिकडे चालले तिकडे चालले म्हणजे कुठे पाऊस पडेल व कुठे ढग कोरडेच फिरतील. अशीच काही स्थिती दिसत आहे. पावसाच्या हुलकावणीमुळे जलस्त्रोताची पातळीही खालावत आहे. त्यामुळे दुष्काळजन्य परिस्थितीचे सावट निर्माण होऊन भविष्यात भिषण पाणी टंचाई उद्भवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मेहकर, सिंदखेडराजा व लोणार तालुक्यातील काही शेतकर्‍यांनी धुळ पेरणी केलेली असून त्यावर निसर्गाच्या अवकृपेमुळे बहुतांश धुळ पेरणी वाया गेली आहे. त्यामुळे अनेक शेतकर्‍यांचे माघामोलाचे बियाणे मातीत गेले आहेत. अनेक शेतकर्‍यांना आता दुबार पेरणी करावी लागणार आहे. या दिवसांत पूरजन्य परिस्थितीमुळे नदीनाले साफ स्वच्छ होऊन दुथडी भरुन वाहत असतात. परंतू, निसर्गाच्या विचित्र बदलामुळे नदीनाले व इतर जलस्त्रोत कोरडी ठण्ण पडली आहेत. तर काही नदी नाल्यांमध्ये थोड्या बहुत प्रमाणात जलसाठा असून, त्यातही शेवाळजन्य व कचरा घाण निर्माण झाल्यामुळे नदीच्या पाण्याला दुर्गंधी येऊ लागली आहे. प्रदुषण मोठय़ा प्रमाणावर निर्माण झाले आहे. पाऊस पडत नसल्याने नदीनाले व इतर जलस्त्रोतांमध्येही अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
पावसाच्या हुलकावणीमूळे सर्वांचीच चिंता वाढत असून, गावागावांमध्ये वरुणराजाला विनवणी करण्यात येत असल्याचे दिसुन येत आहे. ९ जुलै रोजी आषाढी एकादशी असून, पंढरपूरच्या विठूरायाची शेतकर्‍यांसाठी मेहरनजर होवू शकते, अशी विठ्ठल भक्तांची परंपरागत चालत आलेली आगाढ श्रद्धा आहे. त्यामुळे १0 जुलै नंतर मोसमी पावसाच्या साधक बाधक सरी कोसळतील व १२ जुलै आषाढी गुरू पोर्णिमेनंतर दमदार पाऊस होवून पेरण्या सुरू होतील. असा धर्मिक भावनेचा व हवामान शास्त्राचा अंदाज आहे.