शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : वाशिम जिल्ह्यात मृतांचा आकडा शतकाच्या उंबरठ्यावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2020 12:35 IST

CoronaVirus in Washim : आतापर्यंत ९५ जणांचा मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याबरोबरच उपचारादरम्यान मृत्यू होण्याच्या प्रमाणातही वाढ होत असल्याचे दिसून येते. आतापर्यंत ९५ जणांचा मृत्यू झाला. या ९५ जणांमध्ये ५५ वर्षावरील ६८ जणांचा समावेश आहे.जिल्ह्यात पहिला कोरोनाबाधित रुग्ण हा ३ एप्रिल रोजी मेडशी (ता.मालेगाव) येथे आढळला होता. एप्रिल ते जून या तीन महिन्यात जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रित होती तसेच कोरोनामुळे दोन जणांचा मृत्यू झाला होता. जुलै महिन्यापासून जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने झाला; शिवाय कोरोनाबळींची संख्याही वाढली. जुलै महिन्यात उपचारादरम्यान १३ जणांचा मृत्यू झाला. आॅगस्ट महिन्यात कोरोनाबाधित रुग्ण आणि मृतकांचा आकडाही वाढला. सप्टेंबर महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या तसेच मृतकांचा आकडाही बराच फुगला. आतापर्यंत कोरोनामुळे जिल्ह्यातील ९५ जणांना प्राण गमवावे लागले. अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आणि कोरोनाबळींची संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने सरकारी कोविड केअर सेंटरप्रमाणेच जिल्ह्यात आतापर्यंत तीन खासगी कोविड हॉस्पिटललाही मान्यता दिली.

५५ वर्षावरील ६८ जणांचा मृत्यूजिल्ह्यात ५५ वर्षावरील ६८ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे वयोवृद्धांना अधिक धोका असल्याचे यावरून स्पष्ट होते. वयोवृद्ध नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी, कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून वयोवृद्ध नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, आरोग्य जपावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले.

सप्टेंबर महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या जास्त प्रमाणात वाढली. उपचारादरम्यान मृत्यू होणाºयांची संख्याही ९५ च्या घरात आहे. कोरोना विषाणू संसर्गाचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांनी अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे.-डॉ. अविनाश आहेरजिल्हा आरोग्य अधिकारी वाशिम

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या