Corona Cases in Washim : आणखी एकाचा मृत्यू; ४९१ कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 11:44 AM2021-05-09T11:44:11+5:302021-05-09T11:44:18+5:30

Corona Cases in Washim: आणखी एकाच्या मृत्यूची नोंद झाली, तर ४९१ जणांचा कोरोना चाचणी अहवाल  पॉझिटिव्ह आला.

Corona Cases in Washim: Death of another; 491 corona positive | Corona Cases in Washim : आणखी एकाचा मृत्यू; ४९१ कोरोना पॉझिटिव्ह

Corona Cases in Washim : आणखी एकाचा मृत्यू; ४९१ कोरोना पॉझिटिव्ह

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, शनिवार, ८ मे रोजी आणखी एकाच्या मृत्यूची नोंद झाली, तर ४९१ जणांचा कोरोना चाचणी अहवाल  पॉझिटिव्ह आला. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ३१,६०५ वर पोहोचला आहे.

वाशिम शहरासह तालुक्यात रुग्णसंख्या वाढत असल्याने, शहरवासीयांची चिंता वाढत आहे. शनिवारीही वाशिम तालुक्यात १२३ जण कोरोनाबाधित आढळून आले. आणखी एका जणाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद शनिवारी घेण्यात आली. एकूण ४९१ जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. वाशिम १२३, मालेगाव तालुक्यातील ५३, रिसोड तालुक्यातील ५४, मंगरुळपीर तालुक्यातील ७२, कारंजा तालुक्यातील ६८ आणि मानोरा तालुक्यात ८७ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. जिल्ह्याबाहेरील ३४ बाधितांची नोंद झाली असून, ५२४ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने, नागरिकांनी कोरोनाविषयक नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले.

Web Title: Corona Cases in Washim: Death of another; 491 corona positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.