अंगणवाड्यांतील दीड लाखांच्या वाॅटर फिल्टरमध्ये पाण्याचा ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:30 IST2021-09-02T05:30:52+5:302021-09-02T05:30:52+5:30

भर जहागिर येथील पाच अंगणवाड्यांमध्ये बालकांना पिण्याचे स्वच्छ पाणी अंगणवाडीमध्येच उपलब्ध व्हावे या हेतूने स्थानिक ग्रामपंचायतने जवळपास दीड लाख ...

Cooling of water in 1.5 lakh water filters in Anganwadis | अंगणवाड्यांतील दीड लाखांच्या वाॅटर फिल्टरमध्ये पाण्याचा ठणठणाट

अंगणवाड्यांतील दीड लाखांच्या वाॅटर फिल्टरमध्ये पाण्याचा ठणठणाट

भर जहागिर येथील पाच अंगणवाड्यांमध्ये बालकांना पिण्याचे स्वच्छ पाणी अंगणवाडीमध्येच उपलब्ध व्हावे या हेतूने स्थानिक ग्रामपंचायतने जवळपास दीड लाख रुपये किमतीचे पाच ‘वाॅटर फिल्टर’ बसण्यासाठी कंत्राटदाराला काम दिले. यामध्ये वाॅटर फिल्टर, नळ फिटिंग, पाण्याची संचयासाठी छतावर पाचशे लिटर क्षमतेची टाकी एवढे साहित्य होते. सदर काम हे मागील एप्रिल महिन्यामध्ये पूर्ण होऊन कंत्राटदाराने देयकेसुद्धा काढून घेतली. परंतु मागील पाच महिन्यांपासून या अंगणवाड्यातील वाॅटर फिल्टरमधून एकदाही पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध झालेले नाही. विशेष म्हणजे प्रभारी बालप्रकल्प अधिकारी विधाता कवटकर यांनी पाहणी करीत संबंधित वाॅटर फिल्टरचे काम पूर्ण करण्याच्या सूचना संबंधिताना दिल्या, तरीसुद्धा सदर कंत्राटदाराने या महत्त्वाच्या विषयाकडे दुर्लक्ष केल्याचे बोलले जात आहे. यासंदर्भात वाॅटर फिल्टर तात्काळ सुरू करावे अन्यथा आंदाेलन करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडी सर्कलप्रमुख प्रकाश सभादिंडे यांनी दिला आहे.

भर जहागिर येथील पाच अंगणवाड्यातील वाॅटर फिल्टरसंदर्भात ग्रामपंचायत सचिवांशी चर्चा करून पत्र देण्यात येईल.

विधाता कवटकर, प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी, पंचायत समिती, रिसोड

Web Title: Cooling of water in 1.5 lakh water filters in Anganwadis