शहरं
Join us  
Trending Stories
1
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
2
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
3
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा झालमुरी स्टॉल, पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
4
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
5
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
6
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
7
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
8
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
9
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
10
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
11
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
12
IAS Aastha Singh : प्रेरणादायी यशोगाथा! आजोबांनी दाखवलं स्वप्न; अवघ्या २१ व्या वर्षी कोचिंगशिवाय आस्था बनली IAS
13
दिवसाला ८ तास कुलर चालवताय? मग महिन्याला किती वीज बिल येईल? वॉटनुसार जाणून घ्या खर्च!
14
IPL 2026 Points Table : प्लेऑफ्सच्या शर्यतीत कमालीचे ट्विस्ट! कोण टिकणार? कोणाचा प्रवास संपणार?
15
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
16
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
17
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
18
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
19
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
20
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
Daily Top 2Weekly Top 5

..म्हणे चोरीची नव्हे ‘मिसींग’ची तक्रार द्या!

By admin | Updated: December 13, 2014 00:29 IST

लोकमत स्टिंग ऑपरेशन: किरकोळ गुन्हे दाखल करण्यासाठी पोलिसांकडून टाळाटाळ.

वाशिम : जिल्ह्यातील एक-दोन पोलिस स्टेशनचा अपवाद वगळता किरकोळ स्वरूपाच्या चोरीचे गुन्हे दाखल करून घेण्यासाठी पोलिस कर्मचारी टाळाटाळ करीत असल्याचे ह्यलोकमतनेह्ण केलेल्या ह्यस्टिंग ऑपरेशनह्ण मधुन उघड झाले. किरकोळ गुन्हे दाखल करून घेतल्यानंतर चोरीचा तपास करा.चार्जशिट तयार करा यासह ईतर भानगडीला बगल पोलीसांकडून दिल्या जाते. जिल्हयातील लोकमतच्या प्रतिनिधींनी सामान्य नागरिकांच्या मदतीने हे स्टींग ऑपरेशन केले. मानोरा : नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत राहणारे मानोरा पोलिस स्टेशन जिल्ह्यात ओळखले जाते. किरकोळ स्वरुपाची तक्रार घेउन जाणार्‍या नागरिकांना पोलिस स्टेशनच्या कर्तव्यावरील कर्मचार्‍यांकडून कोणत्या प्रकारची वर्तणुक दिली जाते आणि तक्रार नोंदविण्याबाबत कशी तत्परता दाखविली जाते, याची पाहणी करण्यासाठी प्रातिनिधीक स्वरुपात स्टिंग ऑपरेशन करण्यात आले. यावेळी मोबाईल चोरीला गेल्याची नव्हे तर हरविला असल्याची तक्रार द्या, असा सल्ला उपस्थित कर्मचार्‍याने दिल्याचे आढळून आले. येथील पोलिस स्टेशन कार्यालयात स्टेशन डायरीत कार्यरत काही कर्मचार्‍याकडून तक्रारकर्त्यांना योग्य वागणूक मिळत नसल्याचे लोकमतच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये आढळून आले आहे. मानोरा पोलिस स्टेशनमध्ये दुपारी ४ वाजताच्या सुमारास केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये असे आढळून आले, की स्टेशन डायरीवर कार्यरत पोलिस कर्मचारी प्रकाश पडघान यांच्याकडे एका चोरीच्या घटनेची तक्रार आली. मानोरा येथील एका महाविद्यालयात कार्यरत प्राध्यापक हे तक्रार घेऊन आले होते. त्यांचा मोबाईल चोरीस गेल्याची तक्रार करण्यासाठी ते आले होते.; परंतु स्टेशन डायरीत कार्यरत पोलिस कर्मचार्‍यांनी मोबाईल चोरीस गेल्याची नव्हे, तर मोबाईल हरविल्याचा अर्ज द्या, असा सल्ला दिला. मोबाईल हरविल्याबाबत डायरीमध्ये नोंद करून प्राध्यापकाला रवाना करण्यात आले.