पुरात वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:50 IST2021-09-07T04:50:25+5:302021-09-07T04:50:25+5:30

याबाबत अधिक माहिती अशी की, आसेगाव पोलीस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या तालुक्यातील ग्राम रुई (गोस्ता) येथील वाघजी ढंगारे हा पुराच्या ...

The body of a young man who was swept away in the floods was found | पुरात वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह आढळला

पुरात वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह आढळला

याबाबत अधिक माहिती अशी की, आसेगाव पोलीस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या तालुक्यातील ग्राम रुई (गोस्ता) येथील वाघजी ढंगारे हा पुराच्या पाण्यात वाहून गेला होता. घटनेची माहिती मिळताच गावकरी, पोलीस व शोध पथकाच्या चमूने ३ सप्टेंबरपासूनच शोधकार्य हाती घेतले; मात्र ४ सप्टेंबर रोजी पुन्हा धुवाधार पाऊस झाल्याने शोधकार्यात अडचण निर्माण झाली. असे असताना शोध पथकाने कार्य सुरूच ठेवले. अखेर ६ सप्टेंबर रोजी सकाळी भोपळपेंड नदीच्या पात्रात वाघजी ढंगारे हा मृतावस्थेत आढळून आला. गावकऱ्यांनी शोकाकुल वातावरणात वाघजीवर अंत्यसंस्कार केले.

................

गावकरी, शोधपथक आणि पोलिसांनी वाहून गेलेल्या व्यक्तीचा कसून शोध घेतला. नदीला मोठा पूर आल्याने शोधकार्य कठीण गेले; मात्र प्रयत्न सोडले नाहीत. अखेर वाघजी ढंगारेचा मृतदेह नदीच्या पात्रात आढळून आला.

- रविकिरण खंडारे, पोलीस उपनिरीक्षक, आसेगाव पो.स्टे.

Web Title: The body of a young man who was swept away in the floods was found