शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ऑटोचालक संपावर; पालक शाळेवर

By admin | Updated: July 21, 2014 23:06 IST

स्कूल बस घेण्याच्या सूचनेने पुकारला संप : संपाबाबत तोडगा निघालाच नाही

वाशिम : ऑटो, अँपे किंवा व्हॅनऐवजी स्कूल बसद्वारेच विद्यार्थ्यांची वाहतुक करण्याचा फतवा वाहतुक शाखेने काढल्याने, बिथरलेल्या ऑटोचालकांनी संपाचे हत्यार उपसले आहे. २१ जुलै रोजी ऑटोचालक संपावर गेल्याने पाल्यांबरोबरच पालकांचीदेखील 'शाळा' भरली. शाळांचे मार्ग ऑटो, व्हॅनऐवजी मोटारसायकल व कारने फुलून गेले होते. २६ जूनपासून वाशिम जिल्ह्यात शाळांना प्रारंभ झाला आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील ऑटो, व्हॅन व अँपेमधून विद्यार्थ्यांची वाहतुक केली जात आहे. उपप्रादेशिक परिवहन विभाग व वाहतुक शाखेने ठरवून दिलेल्या नियमानुसार सदर वाहतुक सुरू होती. अलिकडच्या दिवसात मात्र शहर वाहतुक शाखेने ऑटो, व्हॅन व अँपेऐवजी स्कूल बसनेच विद्यार्थ्यांची वाहतुक करण्याचा फतवा काढला असल्याचा आरोप ऑटोचालकांनी केला आहे. विद्यार्थ्यांची वाहतुक करणार्‍या ऑटोरिक्षांवर वाहतुक शाखेने कारवाईचा धडाका लावल्याने भयभीत झालेल्या ऑटोचालकांनी संप पुकारला आहे. गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून शहरातील ऑटोरिक्षा चालक शाळकरी मुलांची ने-आण करण्याचे काम करीत आहेत. शहर वाहतुक शाखेने एकीकडे प्रवासी ऑटोचालकांना मुकसंमती देऊन शाळकरी ऑटोचालकांना 'टार्गेट' करणे सुरू केल्याचा आरोपही शाळकरी ऑटोचालकांनी केला. क्षमतेपेक्षा अति विद्यार्थ्यांची वाहतुक करणार्‍या ऑटोरिक्षांवर कारवाई होणे अपेक्षीत आहे. मात्र, नियमानुसार विद्यार्थ्यांची वाहतुक होत असेल तर स्कूल बसचा आग्रह कशासाठी? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पुरेशा प्रमाणात स्कूल बसेस नसल्यामुळे विद्यार्थी व पालकांची चांगलीच तारांबळ उडत आहे. ऑटो चालकांवर कारवाई सुरु झाल्याने नियम न पाळणार्‍या ऑटोचालकांचे धाबे दणाणले आहे. ** चिमुकल्या विद्यार्थ्यांची सुरक्षितताही महत्त्वाची नर्सरी, केजी वन व केजी टु मध्ये शिकणारे चिमुकले ऑटोमधूनच शाळेत जातात. काही ऑटोंमध्ये १0-१२ पेक्षाही अधिक विद्यार्थी बसविले जातात. शिवाय विद्यार्थ्यांचे दप्तर ऑटोच्या दोन्ही बाजूने लटकविले जाते. यामुळे अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. ** ऑटोचालकांची प्रशासनासोबत चर्चा ऑटोचालकांनी प्रथम उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार यांच्याशी चर्चा केली. यावेळी नियमानुसार परमिट असलेल्या ऑटो, अँपेमधून विद्यार्थ्यांची वाहतुक करण्याला आमचा विरोध नसल्याचे नेरपगार यांनी ऑटोचालकांना सांगितले. त्यानंतर ऑटोचालकांनी शहर वाहतुक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांच्याशी चर्चा केली. पवार यांनी परमिट असलेल्या ऑटो किंवा स्कूल बस मधूनच विद्यार्थ्यांंची वाहतुक करण्याचे सांगितले. जिल्हाधिकार्‍यांशीदेखील ऑटोचालकांनी चर्चा केली. मात्र योग्य तोडगा निघू शकला नाही. ऑटोचालक आणि वाहतुक शाखेतून तोडगा निघाला नसल्याने ऑटोचालकांनी अघोषित संप पुकारला आहे. यामध्ये पालकांची मात्र तारांबळ उडत आहे.