शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
2
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
3
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
4
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
5
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
6
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
7
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
8
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
9
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
10
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
11
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
12
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
13
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
14
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
15
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
16
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
17
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
18
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
20
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात कोरोना महासाथीची वर्षपूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 11:19 IST

Anniversary of Corona in Washim District : नागरिकांत मात्र कोरोना संसर्गाची फारशी भीती उरली नसल्याचे त्यांच्या वर्तणुकीवरून दिसत आहे.

वाशिम: जिल्ह्यात ३ एप्रिल २०२० रोजी पहिला कोरोनाबाधित आढळला. आज या घटनेला वर्ष पूर्ण झाले. त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. आता हा पहिला बाधित ठणठणीत असला तरी, बाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून, कोरोना बळींची संख्याही २०० च्या घरात पोहोचली असताना नागरिकांत मात्र कोरोना संसर्गाची फारशी भीती उरली नसल्याचे त्यांच्या वर्तणुकीवरून दिसत आहे.मालेगाव तालुक्यातील मेडशी येथील एक ५९ वर्षीय व्यक्ती गतवर्षी मार्च महिन्यात दिल्ली येथील एका धार्मिक संमेलनात सहभागी झाला होता. तो गावात परतल्यानंतर दोन आठवड्यांनी त्याची चाचणी करण्यात आली. त्यात ३ एप्रिल रोजी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली. त्यानंतर महिनाभर जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित आढळून आला नाही. तथापि, २ मे रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात आयसोलेशन कक्षात दाखल केलेल्या उत्तर प्रदेशातील एका ट्रक क्लिनरचा मृत्यू झाला. त्याचा कोरोना चाचणी अहवाल ३ मे रोजी पॉझिटिव्ह आला. हा जिल्ह्यातील पहिला कोरोना बळी ठरला. दरम्यान, त्यानंतर मंगरुळपीर तालुक्यातील कवठळ येथील एका व्यक्तीचा वर्ध्यात उपचार घेत असताना मृत्यू झाला आणि तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले. 

पहिला कोरोना बाधित व्यवसायात मग्न जिल्ह्यात ३ एप्रिल रोजी पहिला कोरोना बाधित रुग्ण आढळला होता. मालेगाव तालुक्यातील मेडशी येथील या व्यक्तीने उपचाराला प्रतिसाद देत कोरोनावर मात केली. या व्यक्तीचा दुधाचा व्यवसाय असून, तो दुग्ध व्यवसायात मग्न असून, कुटुंबासोबत आनंदात वेळ घालत असल्याचे त्याने सांगितले. 

जिल्हाभरात १४ कोविड सेंटरऑक्टोबर २०२० पासून कोरोना संसर्ग नियंत्रणात येऊ लागल्याने शहर स्तरावरील ग्रामीण रुग्णालये आणि जिल्हास्तरावरील जिल्हा रुग्णालयासह इतर एक, दोन ठिकाणी कोविड सेंटर सुरू ठेवत इतर बंद करण्यात आले; परंतु आता कोरोना संसर्ग वाढत आहे.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या