दुकानाची भिंत फोडून १.९७ लाखाचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 12:11 IST2021-01-19T12:11:24+5:302021-01-19T12:11:33+5:30

Crime News चोरट्यांनी एक लाख ९७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना १७ जानेवारीच्या रात्रीदरम्यान घडली.

1.97 lakh was stolen by breaking the wall of the shop | दुकानाची भिंत फोडून १.९७ लाखाचा ऐवज लंपास

दुकानाची भिंत फोडून १.९७ लाखाचा ऐवज लंपास

मालेगाव : मालेगाव शहरातील पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या न्यूज वाॅच सेंटर या दुकानाची भिंत फोडून चोरट्यांनी एक लाख ९७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना १७ जानेवारीच्या रात्रीदरम्यान घडली. गत तीन दिवसात चोरीच्या तीन घटना घडल्याने शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. 
दोन दिवसाअगोदर महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला होता. शनिवारी नवीन मालेगावातील सरकटे यांच्या घरातील  सोन्याचे दागिने आणि मोटरसायकल, रोख रक्कम असा एकूण दोन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. १७ जानेवारी रोजी पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या न्यू वॉच सेंटर या दुकानाची मागील भिंत तोडून प्रवेश केला व दुकानातील मोबाइल, घड्याळ व इतर साहित्य असा एक लाख ९७ हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला. चोरटा हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद  झाला आहे. 

Web Title: 1.97 lakh was stolen by breaking the wall of the shop