४९१ ग्राम पंचायतींचे ‘दप्तर’ कुलूपबंद; गावपातळीवर कामकाज ठप्प !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 05:38 PM2019-08-24T17:38:33+5:302019-08-24T17:38:51+5:30

ग्रामसेवकांनी आक्रमक पवित्रा घेत ग्रामपंचायतींमधील ‘दप्तर’ कुलूपबंद ठेवल्याचा जबर फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.

1949 'Panchayats office locked ; Work at village level jam! | ४९१ ग्राम पंचायतींचे ‘दप्तर’ कुलूपबंद; गावपातळीवर कामकाज ठप्प !

४९१ ग्राम पंचायतींचे ‘दप्तर’ कुलूपबंद; गावपातळीवर कामकाज ठप्प !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : प्रलंबित मागण्यांकडे शासन, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामसेवकांनी आक्रमक पवित्रा घेत ग्रामपंचायतींमधील ‘दप्तर’ कुलूपबंद ठेवल्याचा जबर फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी ठप्प असल्याने नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
वेतन त्रूटी दूर करणे, जूनी पेन्शन योजना लागू करणे, अतिरिक्त कामे कमी करणे, पदोन्नती यासह प्रलंबित मागण्यांकडे शासन, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामसेवकांनी विविध टप्प्यात आंदोलन केले; परंतू या आंदोलनाची दखल न घेतल्याने २२ आॅगस्टपासून ग्रामसेवकांनी आपल्या कपाटला कुलूप लावून गटविकास अधिकाºयांकडे चाव्या सुपूर्द केल्या. अद्याप या आंदोलनावर कोणताही तोडगा निघाला नाही. जिल्ह्यातील ४९१ ग्राम पंचायतींमधील ग्रामसेवकांचे कपाट कुलूपबंद असल्याने गावपातळीवरील संपूर्ण कामकाज ठप्प झाले आहे. १४ वा वित्त आयोग, प्रधानमंत्री यासह विविध आवास योजना, स्वच्छ भारत मिशन, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, जनसुविधा योजना, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास योजना, वैयक्तिक लाभाच्या विविध योजना, नागरिकांना विविध दाखले व सेवा पुरविणे, ग्रामपंचायत कार्यालयीन कामकाज, ग्रामसभा, मासिक सभा आदी संपूर्ण कामे ठप्प असल्याचा फटका गावकºयांना बसत आहे. सिंचन विहिर योजनेच्या लाभासाठी ग्रामसभेचा ठराव आवश्यक असून, या आंदोलनामुळे ठराव मिळणेही कठीण झाले आहे. परिणामी, या लाभापासून वंचित राहण्याची भीती शेतकºयांमधून वर्तविली जात आहे.

Web Title: 1949 'Panchayats office locked ; Work at village level jam!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.