शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

१९ उमेदवार रिंगणाबाहेर

By admin | Updated: September 30, 2014 01:27 IST

वाशिम जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघात १२४ उमेदवारांचे २0५ अर्ज

वाशिम : आगामी १५ ऑक्टोबरला होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत तीनही मतदारसंघातून १२४ इच्छुक उमेदवारांनी एकूण २0५ नामांकन दाखल केले होते. २९ सप्टेंबर रोजी अर्ज छाननीत ३५ अर्ज अर्ज रद्द झालेत. यामधील एकूण १९ उमेदवार रिंगणाबाहेर पडले आहेत. कारंजा विधानसभा मतदारसंघातील १७, वाशिम विधानसभा मतदारसंघातील १0 तर रिसोड विधानसभा मतदारसंघातील ८ अर्जांचा समावेश आहे. वाशिम विधानसभा मतदार संघामध्ये उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांपैकी आज छाननीत १0 अर्ज रद्द करण्यात आले यामध्ये आत्माराम अडागळे, शाम खोडे, रजनी राठोड, किसन गायकवाड, भानुदास खंदारे, अन्नपूर्णा कंकाळ, ङ्म्रावण कांबळे, साहेबराव भगत, बबनराव खिल्लारे, नालंदा चक्रनारायण यांचा समावेश आहे. हे दहा उमेदवार रिंगणाबाहेर पडले आहेत. रिसोड विधानसभा मतदारसंघात एकूण उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांपैकी चार उमेदवारांचे आठ अर्ज रद्द करण्यात आले. यामध्ये सोनाली प्रकाश साबळे, सुनील ङ्म्रीपतराव पाटील, नानाराव तुकाराम घुगे, विशाल पंजाबराव घुगे या उमेदवारांचा समावेश आहे. कारंजा विधानसभा मतदारसंघात दाखल करण्यात आलेल्या ८४ उमेदवारी अर्जांपैकी १७ अर्ज अवैध ठरले आहेत, तर ५ उमेदवार बाद ठरले आहेत. कारंजा विधानसभा मतदारसंघात ४४ उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले. कारंजा विधानसभा मतदारसंघातून नामांकन दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंंत अर्थात २७ सप्टेंबरपर्यं त एकूण ४९ उमेदवारांकडून ८४ नामांकन अर्ज दाखल करण्यात आले होते. अर्ज छाननीच्या दिवशी २९ सप्टेंबर रोजी यातील १७ अर्ज अवैध ठरले. प्रत्येकी एक अर्ज दाखल करणार्‍या पाच उमेदवारांच्या अर्जांंचा यामध्ये समावेश असल्याने या पाचही जणांची उमेदवारीही रद्द झाली. यामध्ये प्रकाशआप्पा निंबलवार, सदाशिव लोडम, कृष्णराव राठोड, उमेश शितोळे, नरेंद्र गोलेच्छा यांचा समावेश आहे. ज्यांचे अर्ज अवैध ठरले आहेत. ज्यांची उमेदवारी कायम आहे; मात्र ज्यांचे अर्ज दोनपेक्षा अधिक आहेत त्यामध्ये विद्यमान आमदार प्रकाश डहाके, भारत सावळे, राजू जोगदंड, सदाशिव लोडम, सुनील राठोड, राजेश जाधव, रामदेव राठोड, कृष्णराव राठोड, रामनाथ राठोड, अरविंद इंगोले, पटेल इफ्तेखार अहेमद, अनिल राठोड यांचा समावेश आहे. तीनही विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व भाजपा या प्रमुख पक्षांमध्ये अनेक पदाधिकारी व वजनदार कार्यकर्त्यांंची उमेदवारी कायम आहे. त्यामुळे या उमेदवारांची प्रमुख पक्षांच्या उमेदवारांना चांगलीच डोकेदुखी होणार.