शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाकडून तरुणाची धुलाई

By admin | Updated: October 10, 2016 03:07 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आपत्तीजनक छायाचित्रे फेसबुकवर टाकणाऱ्या मोबिनच्या शोधार्थ गणेश देवलनगरमध्ये आलेल्या भाजपा, विहिंप व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी

मीरा रोड : पंतप्रधान नरेंद्र मोदींची आपत्तीजनक छायाचित्रे फेसबुकवर टाकणाऱ्या मोबिनच्या शोधार्थ गणेश देवलनगरमध्ये आलेल्या भाजपा, विहिंप व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी अब्दुल कलाम याला विनाकारण लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची तक्रार कलाम याने केली आहे. पोलिसांनी अद्याप मारहाण करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई केली नाही.भार्इंदर पश्चिमेकडील गणेश देवलनगरमध्ये रामाग्या यादव यांची खोली असून त्यांनी ती गेल्या दोन वर्षांपासून मोबिन अहमद यास भाड्याने दिली आहे. स्टील कारखान्यात काम करणारा मोबिन हा आपल्या अन्य तिघा सहकाऱ्यांसह राहतो. मोबिन याने फेसबुकवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विडंबनात्मक छायाचित्रे टाकल्याने भाजपा, विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे कार्यकर्ते मोबिनला मारण्यासाठी शुक्रवारी रात्री उशिरा दुचाकीवरून तो राहत असलेल्या घरात शिरले. त्यावेळी मोबिन त्यांना सापडला नाही. मात्र, मोबिनसोबत राहणारा अब्दुल कलाम याला त्यांनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या धटिंगणशाहीची दखल घेऊन मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे सोडून पोलिसांनी कलाम याला पोलीस ठाण्यात आणून चौकशीसाठी बसवून ठेवले. (प्रतिनिधी)आपण काही केलेले नाही. फेसबुकवर कुणी काय पोस्ट टाकली, तेही आपल्याला माहीत नाही. अचानक रात्री गुंड घरात शिरले व मारहाण करू लागले. पोलिसांनी मला मारहाण झाल्याची ना तक्रार घेतली, ना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई केली. - अब्दुल कलामआम्ही कुणालाही मारहाण केलेली नाही. अन्य कुणी लोकांनी मारहाण केली असेल. मात्र, पोलिसांची पूर्वपरवानगी न घेता खोली भाड्याने देणाऱ्या आरोपीला अटक करण्याची मागणी केली आहे. -विनोद शिंदे, सचिव, भाजपा युवा मोर्चा फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या मोबिनचा आम्ही शोध घेत आहोत. याबाबत, तक्रार आली असून वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार तक्रारी व घडलेला प्रकार सरकारी वकिलांकडे कायदेशीर सल्ल्याकरिता पाठवला आहे. त्यांचा अभिप्राय आल्यावर पुढील कारवाई केली -अनिल कदम, वरिष्ठ निरीक्षक