वसई न्यायालयातून दुहेरी हत्येचा आरोपी फरार; नालासोपारा पोलिसांच्या १५ वर्षांच्या मेहनतीवर पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 17:08 IST2026-05-19T17:08:16+5:302026-05-19T17:08:16+5:30

वसई न्यायालयातून हत्येमधील आरोपी पसार; न्यायालयातील तिसरी घटना

Vasai Court Security Breach Double Murder Accused Escapes From Police Custody | वसई न्यायालयातून दुहेरी हत्येचा आरोपी फरार; नालासोपारा पोलिसांच्या १५ वर्षांच्या मेहनतीवर पाणी

वसई न्यायालयातून दुहेरी हत्येचा आरोपी फरार; नालासोपारा पोलिसांच्या १५ वर्षांच्या मेहनतीवर पाणी

मंगेश कराळे

नालासोपारा : वसई न्यायालयातून दुहेरी हत्येच्या गुन्ह्यामधील  एक आरोपी पोलिसांना चकवा देत फरार झाल्याची घटना घडली. वसई न्यायालयातून तिसऱ्यांदा अशा स्वरूपाचा आरोपी फरार झाला आहे. अजय सोनी असे फरार आरोपीचे नाव आहे. 

१५ वर्षापूर्वी नालासोपारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुहेरी हत्या करून सदर आरोपी गायब झाला होता. पोलिसांनी त्याला अटक करून ठाणे मध्यवर्ती कारगृहात जेरबंद करण्यात आले होते. सोमवारी वसई न्यायालयात त्यास हजर करण्यासाठी आणले होते. यावेळी जात असल्याचे सांगून त्यांनी पोलिसांना गुंगारा दिला. यापूर्वी अशा दोन घटना घडल्या होत्या. शौचालयाची खिडकी फोडून त्यातून दोन वेळा आरोपी पसार झाले होते. त्यामुळे वसई न्यायालयाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. नव्या घटनेमुळे पुन्हा यावर प्रश्नचिन्ह लागलेले आहे 

२९ एप्रिल ते २ मे २००९ दरम्यान बिलालपाडा येथील खंडोबा मंदीरा जवळ विनोद शंकरलाल जयस्वाल (३८) हे आरोपी कैलास ललन यादव, विनय उर्फ अजय, धर्मेद्र सोनी आणि किरण सोनी या चौघांनी मिळुन दलालीचे पैसे घेण्याकरीता आले होते. आरोपींनी आपसात संगनमत करुन त्याचे हातपाय नायलॉनचे दोरीने व साडीने बांधुन गमचाने (टॉवेलने) गळा आवळुन तोंडा भोवती कपडा गुंडाळून जिवे ठार मारले होते. नालासोपारा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता. वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार या गुन्ह्यातील मुख्य फरार आरोपीचा शोथ घेण्यासाठी गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी तपास सुरु केला.

आरोपी हा अपराध केल्यापासुन आपली ओळख लपवुन तो इटारसी, भोपाळ मध्यप्रदेश येथे राहत होता. तांत्रिक विश्लेषण  व बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार नायगाव पूर्वेकडील परीसरात सापळा रचून मुख्य आरोपी अविनाश लालताप्रसाद सोनी (४२) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या तपासात नमूद गुन्ह्याची कबूली दिल्याने अटक केली. आरोपीने चौकशी दरम्यान आझमगड उत्तरप्रदेश येथे सन १९९८ मध्ये खुन केल्याची कबुली दिलेली होती. नालासोपारा गुन्हे प्रकटीकरण शाखा यांनी मोठ्या मेहनतीने पकडलेला आरोपी पसार झाल्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह लागलेले आहे. याबाबत वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title : वसई न्यायालय: दोहरा हत्या का आरोपी फरार, पुलिस की मेहनत पर पानी।

Web Summary : वसई न्यायालय से दोहरा हत्या का आरोपी अजय सोनी फरार हो गया, जिससे पुलिस की 15 साल की मेहनत बेकार हो गई। न्यायालय में यह तीसरी घटना है, जिससे सुरक्षा पर सवाल उठ रहे हैं। वह 2009 के हत्या मामले में गिरफ्तार हुआ था।

Web Title : Vasai court: Double murder accused escapes, police efforts foiled.

Web Summary : A double murder accused, Ajay Soni, escaped from Vasai court, undermining 15 years of police work. This is the third such incident at the court, raising security concerns. He had been arrested for a 2009 murder case after being on the run for years.