शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पाचगणी शाळेत विद्यार्थ्यांचा छळ

By admin | Updated: October 28, 2016 02:30 IST

आदिवासी विकास विभागाअंतर्गत आदिवासी विद्यार्थांना इंग्रजी शिक्षण मिळावे या उद्देशाने नामांकित इंग्लिश मिडीयम शाळांत कोट्यवधी रुपये खर्च करून आदिवासी

जव्हार : आदिवासी विकास विभागाअंतर्गत आदिवासी विद्यार्थांना इंग्रजी शिक्षण मिळावे या उद्देशाने नामांकित इंग्लिश मिडीयम शाळांत कोट्यवधी रुपये खर्च करून आदिवासी विभागाकडून आदिवासी विद्यार्थांना प्रवेश मिळवून दिला जातो. मात्र या शाळांच्या व्यवस्थापनाकडून विद्यार्थांना आरोग्याच्या सुविधा आणि शैक्षणिक सुविधा मिळत नसल्याने, सहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्यांना पालकांनी घेराव घालून चांगलेच धारेवर धरले आहे. पालकांनी नाराजी व्यक्त करून आपल्या मुलांना या शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या मुलांना शिक्षण देता की, शिक्षा देता, असा प्रश्न सहाय्यक प्रकल्प अधिका-यांना केला आहे.जव्हार आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत जव्हार, मोखाडा, विक्र मगड व वाडा या तालुक्यातील आदिवासी मुलांना इंग्रजी शिक्षणासाठी पाचगणी येथील ब्लुमिंगडेल इंग्लिश मिडीयम स्कूल या नामांकित शाळेत प्रवेश मिळवून देण्यात आला आहे. गेल्या शैक्षणिक वर्षात १ ली ते ५ वीपर्यंतची ९८ मुले या शाळेत दाखल करण्यात आली होती. तर या शैक्षणिक वर्षात ९३ मुले अशी एकूण- १९१ विद्यार्थी या शाळेत सध्या शिक्षण घेत आहेत. मात्र विद्यार्थ्यांना शैक्षणिक व आरोग्याच्या सुविधा मिळत नसल्याचे, पालकांनी सांगितले. या मुलांच्या हाता, पायांना खरूज जडली आहे. डोक्यात उवा पडल्या असून, मळके व न धुतलेले कपडे त्यांना वापरावे लागत असल्यामुळे अन्य आजारांचे प्रमाणही वाढले आहे, असे पालकांनी सांगितले आहे. गेल्या वर्षी पहिलीतल्या मुलांना येणारे स्पेलिंग ती दुस-या वर्षात गेल्यावर त्यांना येत नसल्याची खंत पालकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आपल्या मुलांना या नामांकित इंग्रजी शाळेत पाठवून तरी उपयोग काय असा प्रश्न सहायक प्रकल्प अधिका-यांना पालकांनी केला आहे. आदिवासी मुलांना उच्च इंग्रजी शिक्षण मिळावे, त्यांची शैक्षणिक दर्जा वाढून त्यांची प्रगती व्हावी, या दृष्टीकोनातून आदिवासी विकास विभागाने घेतलेला निर्णय आदिवासी मुलांच्या हिताचाच आहे. मात्र शासनाच्या नियोजना अभावी व ज्या शाळांत आदिवासी विद्यार्थांना प्रवेश देण्यात आला आहे. त्यांच्या व्यवस्थापनाच्या अनास्थेमुळे या मुलांनी तिथे शिक्षण घ्यायचे कसे? असा प्रश्न पडला आहे. त्यातच सुविधा मिळत नसल्याने अनेक मुलांमध्ये आजाराचे प्रमाण वाढले असल्याचे पालकांनी सांगितले. (वार्ताहर)आमच्या मुलांना पाचगणीतील नामांकीत शाळेत शैक्षणिक व आरोग्याच्या सुविधा व्यवस्थित मिळत नाहीत. वर्ष वाया गेले तरी चालेल परंतु आम्ही आमच्या मुलांना दिवाळीनंतर या शाळेत पाठविणार नाही. कारण त्याला आदिवासी विभागाचा निष्काळजीपणा जबाबदार आहे. - शिवराम पाटारा, पालक,अलोंडा.आम्ही या विद्यार्थांच्या शैक्षणिक व आरोग्याच्या सुविधांबाबत संबंधित शाळेच्या व्यवस्थापनाला सुविधा द्यायला लावू. ही बाब अपर व आयुक्तांनाही कळवू.- बी.के. लोंडे, स.प्रकल्प अधिकारी जव्हार.