शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

सरपंचाविरोधातील तक्रारींचे पडसाद

By admin | Updated: May 14, 2017 22:42 IST

सातपाटी गावातील रस्त्यावरील अडथळ्यासह बंधाऱ्या लगत करण्यात आलेल्या अतिक्र मणामुळे वाहनांसह नागरिकांना सुरिक्षत चालणे सुद्धा दुरापास्त झाले आहे

लोकमत न्युज नेटवर्कपालघर : सातपाटी गावातील रस्त्यावरील अडथळ्यासह बंधाऱ्या लगत करण्यात आलेल्या अतिक्र मणामुळे वाहनांसह नागरिकांना सुरिक्षत चालणे सुद्धा दुरापास्त झाले आहे. हे अडथळे दूर करण्यास अपयशी ठरलेल्या सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्या विरोधात सागरी पोलीस स्टेशनमध्ये तक्र ार दाखल करण्याचे पडसाद ग्रामसभेत उमटले.सातपाटी ग्रामपंचायतीची तहकूब झालेली ग्रामसभा शुक्र वारी श्रीराम मंदिरात पार पडली. ह्यावेळी सोयीसुविधांचा वानवा, रद्द करण्यात आलेला धूप प्रतिबंधक बंधारा, वाढत चाललेली अतिक्र मणे, अडथळे, कचरा, अस्वच्छता असे अनेक प्रश्न उपस्थित करून ग्रामसभेत आपला राग व्यक्त केला. सातपाटी गावात या सीएसआर फंडाद्वारे अथवा आपल्या नातेवाईकांच्या स्मरणार्थ अनेक लोकांनी सिमेंटची बाकडे दिले असून ते रस्त्याच्या कडेला ठेवण्यात आल्याने अडथळे निर्माण होत आहे. त्यावर रात्री दारूच्या पार्ट्या रंगत असल्याच्या अनेकांच्या तक्र ारी आहेत.सातपाटीचा धूप प्रतिबंधक बंधाऱ्याचा प्रस्ताव नामंजूर करण्यात आल्याने घरे उध्वस्त होण्याच्या भीतीने ग्रासलेल्या अनेक महिलांनी ग्रामसभा डोक्यावर घेत तात्काळ उपाय योजना आखण्याची मागणी केली आहे. परंतु समुद्रा लगतच्या धूप प्रतिबंधक बंधाऱ्याच्या जवळ वाढणारी बेकायदेशीर झोपडपट्टी बाबत जिल्हाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती राजन मेहेर ह्यांनी सभेत दिली. खाडीत उभारण्यात आलेल्या बंधाऱ्याला लागूनच अनेक लोकांनी घरे, गोदामे बांधली असून अश्या लोकांना ग्रामपंचायतीनी ना हरकत दाखला देऊ नये अशी मागणी होत असताना नव्याने उभ्या राहणाऱ्या मार्केट मध्ये अतिक्र मण करणाऱ्यांवर कारवाईची मागणी जगदीश नाईक ह्यांनी केली. दांड्यावर उभारण्यात आलेली शौचालये सुरु केल्यास आत्मदहनाची धमकी देणाऱ्याविरोधात पोलिसात तक्र ार दाखल करण्याची मागणीही ह्यावेळी करण्यात आली.